IMPIMP

Ajit Pawar | ‘मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघंही वेडे नाहीत’, अजित पवारांचे विरोधकांना सडेतोड उत्तर (Video)

by sachinsitapure
Ajit Pawar | ajit pawar chandani chowk innogration ceremony of chandani chowk flyover

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माझा (Ajit Pawar) मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे अशा चर्चा आणि बातम्या चालवल्या जातात मात्र खुर्ची एक आहे आणि त्यावर दोघांचा डोळा आहे, असं शक्य नाही. मुळात मुख्यमंत्री पदाची खुर्ची (CM Chair) रिक्त नाही. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चावर डोळा ठेवायला आम्ही दोघंही वेडे नाहीत, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना सडतोड प्रत्युत्तर दिले आहे. ते पुण्यात बोलत होते.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, तब्येतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री येऊ शकले नाहीत. पत्रकारांनी याची नोंद घ्यावी. अलीकडे ते रुसले-फुगले अशा बातम्या सुरु झाल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी जर राज्याच्या विकासासाठी पैसे दिले तर का घ्याचे नाहीत? विकास म्हटल की नाव येतं नितीन गडकरींच, असं म्हणत अजित पवार यांनी गडकरी यांचे कौतुक केले.

सध्या राज्यात 15 ऑगस्टला ध्वजारोहण (Flag Hoisting) कोण कुठे करणार यावरून उलटसुलट चर्चा होत आहे. यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, खूर्ची एक असेल तर तिथं दोघांचा डोळा कसा असेल बरं, पण लगेच विरोधक कोल्डवॉर सुरू असल्याचं म्हणतात. उगीच आपलं पुण्यातील 15 ऑगस्ट चं झेंडावंदन अजितदादा करणार की चंद्रकांत (Chandrakant Patil) दादा करणार? असं म्हणायचं. याला काय अर्थ आहे. अरे बाबांनो वर्षानुवर्षे इथं 15 ऑगस्टला राज्यपाल झेंडावंदन करत असतात.आमच्यात कसलाही वाद नाही असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

तुम्हाला काय त्रास होतो?

मी या राज्याचा अर्थमंत्री (Finance Minister) म्हणून कामांचा आढावा घेऊ शकतो. फायनल निर्णय मुख्यमंत्री शिंदे
(CM Eknath Shinde) यांचाच असतो. राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar) ही बैठकीला होते.
पण काहींनी वेगळ्याच बातम्या चालवल्या. हे असं झालं, ते तसं झालं, असे तुम्हाला काय त्रास होतो? जर राज्याचे प्रश्न,
मेट्रोचे प्रश्न मार्गी लागत असतील तर काय अडचण आहे? यंत्रणा हलवली की कामं मार्गी लागतात.
मी आज आढावा घेतला तरीही मुख्य निर्णय मुख्यमंत्र्यांचाच असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा.
लोकांची कामं झाली पाहिजेत म्हणून आम्ही लक्ष देत आहोत. तुम्ही काम रखडलं तर सांगी, आम्ही लक्ष देऊ,
राज्याचा विकास होण महत्त्वाचं आहे, असंही अजित पवार म्हणाले.

Web Title : Ajit Pawar | ajit pawar chandani chowk innogration ceremony of chandani chowk flyover

Related Posts