IMPIMP

Pune Crime News | चोरी करताना रोखले, पोलीस गेल्यानंतर पुन्हा येऊन सुरक्षारक्षकाला केली मारहाण

by sachinsitapure
Pune Crime News | He was stopped while stealing, after the police left, he came back and beat up the security guard

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | येरवडा येथील विसर्जन घाटावरील लोखंडी पाईप चोरुन नेताना सुरक्षा रक्षकाने (Security Guard) हटकून पोलिसांना बोलावले. तेव्हा ते पळून गेले. पोलिस निघून गेल्यावर पुन्हा येऊन चौघा चोरट्यांनी सुरक्षारक्षकाला बांबुने मारहाण (Beating) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत विनोद ज्ञानोबा वाघंबरे (वय ३४, रा. चिखली, पिंपरी चिंचवड) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५५८/२३) दिली आहे. हा प्रकार येरवडा येथील मुळा – मुठा नदी सुधार प्रकल्पाच्या (Mula – Mutha River Improvement Project) गणेश विसर्जन घाट (Ganesh Visarjan Ghat Yerwada) येथे शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गणपती विसर्जन घाट येथे रात्रपाळीला सुरक्षारक्षक म्हणून काम
करत होते. त्यावेळी दोन चोरटे मुठा नदी सुधार प्रकल्प येथे आले. त्यांनी प्रकल्पावरील लोखंडी प्रॉमस (लोखंडी स्पोर्ट पाईप)
चोरुन घेऊन जाऊ लागले. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना हटकले. ते दमबाजी करु लागले. फिर्यादी यांनी पोलिसांना बोलावले.
तेव्हा ते पळून गेले. पोलिसांनी येऊन पाहणी केली. चोरटे पळून गेल्याने पोलीस निघून गेले.
पोलिस निघून गेल्यानंतर ते दोघे व त्यांचे आणखी दोन साथीदार पहाटे पुन्हा आले व त्यांनी फिर्यादी व त्यांचे
सहकारी अक्षय गजभिव यांना बांबुने मारहाण करुन जखमी केले.

Web Title : Pune Crime News | He was stopped while stealing, after the police left, he came back and beat up the security guard

Related Posts