IMPIMP

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

by sachinsitapure
Sharad Pawar Praful Patel

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Ajit Pawar | राष्ट्रवादी (NCP) काँग्रसमध्ये बंडखोरी करत पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा मोठा गट अजित पवारांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी झाला. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा गट आणि अजित पवार गटातील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे. परंतु, नव्या संसदेत सुरु झालेल्या अधिवेशनामध्ये अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (MP Praful Patel) आणि शरद पवार एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, व्हायरल फोटो बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आज (रविवार) पुण्यात प्रतिक्रिया दिली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अजित पवार म्हणाले, मला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा फोटोवर काही बोलायचे नाही. माध्यमं याचा फोटो आणि त्याचा फोटो असं विचारता. माझं ते काम नाही. तुम्ही विकासाबद्दल मला प्रश्न विचारा, अशी प्रतिक्रिया पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, मी सातत्याने महाराष्ट्रात फिरत असताना विकास करण्यासाठी,
प्रश्न सोडवण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी एक भूमिका घेतली आहे. माझे काम त्या पद्धतीने सुरु आहे. मी माझ्या ज्या बैठका घेतो आहे, आढावा घेत आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांना गती देतो आहे. त्यासाठी 15 दिवसांनी, तीन आठवड्यांनी बैठका घेऊन ती कामं कशामुळे थांबली आहेत, का पुढे जात नाही, काय अडचणी आहेत त्या सोडवतो. याचा आढावा घेतला की कामाला गती मिळते असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar)
यांनी केलेल्या टीकवर बोलताना अजित पवार म्हणाले, हा असं म्हटला,
तो तसा म्हटला यावर मला बोलायचं नाही. सध्या वाचाळविरांची संख्या वाढली आहे.
त्यांच्या वक्तव्यावर आपण काहीतरी वक्तव्य करणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती
नाही आणि परंपराही नाही. आपण आपलं काम करत रहायचं.

Related Posts