IMPIMP

Ajit Pawar | ‘तर अजित पवारांनी आधीच खंडन केलं असतं, पण…’ अजित पवारांच्या भूमिकेवर शिंदे गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar refuses to join bjp alongwith ncp mlas shivsena reacts

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात
रंगल्या होत्या. त्यावर मंगळवारी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं सांगितलं. तसेच
काही जण गैरसमज पसरवत असल्याचा आरोप केला. काही लोकांकडून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु असून या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे
अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले.

 

अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) प्रवक्ते नरेश म्हस्के (Spokesperson Naresh Mhaske) यांनी यावरुन सूचक विधान केलं आहे. अजित पवार यांच्या बाबत ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्यावर एकच बोलेन, शुगर वाढल्यामुळे ऑपरेशन पुढे गेलं. जर तसं काही नसतं, तर आधीच त्यांनी खंडन केलं असतं पण तसं काही त्यांनी केलं नाही. अजित पवार नाराज आहेत, हे आता स्पष्ट दिसतंय, असं नरेश म्हस्के म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नरेश म्हस्के पुढे म्हणाले, झाकली मुठ सव्वालाखाची ही बिन बोलाची आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. सभेत खूर्ची कोणती लावायची, ज्या पक्षाकडे फक्त 15 आमदार त्या पक्षाला मोठी खूर्ची. अजित पवारांकडे 56 आमदार आहेत, त्यांना जास्त किंमत पाहिजे की 15 आमदार असणाऱ्यांना? यांनी सगळ्यांनी आधी भाषण करायची, यांची भाषणे सुरू असताना हात वर करून 15 आमदारांचा नेता येतो आणि त्यांचे भाषण थांबवलं जातं, असा टोला म्हस्के यांनी लगावला.

 

नागपूरच्या सभेत अजित पवारांनी भाषण केलं नाही, यावरून हे बरंच काही सांगून जातं. त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांची गळचेपी होत आहे. ही काही ‘वज्रमूठ’ आहे की सैल झालेली मूठ आहे, हे स्पष्ट होतंय. असेही नरेश म्हस्के यांनी म्हटले.

 

 

Web Title :-  Ajit Pawar | ajit pawar refuses to join bjp alongwith ncp mlas shivsena reacts

 

हे देखील वाचा :

Mahila Samman Yojana in MSRTC Bus | महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात 17 लाखाहून अधिक महिला प्रवाशांनी घेतला लाभ

Yashwant Sahakari Sakhar Karkhana in Kunjirwadi, Pune | यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना निवडणूक निधी जमा करण्याचे आवाहन

Iron Hoarding Collapses In Pune’s Pimpri Chinchwad | होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 3 लाख रुपये

MP Supriya Sule | मार्केटमध्ये जे नाणे चालते, त्याचीच जास्त चर्चा होते – खा. सुप्रिया सुळे (व्हिडिओ)

 

Related Posts