IMPIMP

Ajit Pawar | अजित पवारांनी कार्यकर्ते, नेत्यांना सुनावलं, दोन्हीकडच्या सभेत दिसू नका, कुणा एकाचं कुंकू लावा; चुकलात तर गाठ माझ्याशी

by sachinsitapure

बारामती : Ajit Pawar | काही कार्यकर्ते माझ्या देखील सभेमध्ये येतात मला दिसतात आणि दुसरे सभेला आले की त्यांच्याकडेही जातात. कार्यकर्त्यांनो कुणा एकाचं कुंकु लावा आणि मी ज्या कार्यकर्त्यांना पद दिली मानसन्मान दिला आणि जर तो कार्यकर्ता चुकला तर अजित पवारशी गाठ आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दम भरला आहे. ते बारामतीमधील शिर्सुफळ येथील सभेत बोलत होते. (Baramati Lok Sabha)

अजित पवार मतदारांना आवाहन करताना म्हणाले, चाळीस वर्षांपूर्वी तुमच्या घरात आलेल्या सुनेला मतदान करायचे का मुलीला मतदान करायचे हे तुम्ही ठरवा. चार दिवस सासुचे ही म्हण ऐकली आहे मात्र आता चार दिवस सुनेचे येऊ द्या. एक काळ झाला की सासूदेखील सुनेच्या हातात घराचा कारभार देते. आता सुनेला मतदान करण्याची गरज आहे. बारामतीच्या विकासासाठी सुनेत्रा पवारांना (Sunetra Ajit Pawar) मत द्या.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले, मागील खासदाराने काय केले हे आपल्याला माहिती आहे. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील लोक आपल्या चांगल्या संपर्कातले आहेत. ते शब्द खाली पडू देणार नाही आणि विकास केला तर निधीदेखील देतील. राज्याचा निधी आपल्याला कमी पडतो म्हणून केंद्राचा निधी आणणे गरजेचे आहे.

अजित पवार म्हणाले, कृष्णा नीरा भीमा नदी जोड काम सुरू आहे कृष्णा खोऱ्याचे पाणी नीरा नदीत आणले आहे. आणि नीरा नदीतून ते भीमा नदीत उजनी धरणात सोडले जाणार आहे, या पाण्याचा फायदा मराठवाड्याला होणार आहे. त्यामुळे कोणाला मत द्यायचे हे ठरवण्याचे काम तुमचे आहे.

अजित पवार म्हणाले, एकेकाळी मीदेखील मोदींवर टीका करायचो. मात्र खरा विकास मोदींनी केला आहे. देशात ७१ हजार कोटीची कर्जमाफी झाली, असे विरोधक सांगतात मात्र राज्याची किती झाली? याचा आकडा एकदा जाऊन बघा. सगळेच कामे मी करतो, असा दावा मी करत नाही मात्र काही वैयक्तिक कामे मी केली आहेत. ती मलाही माहिती आहेत.

शरद पवारांवर निशाणा साधत अजित पवार म्हणाले, या निवडणुकीत भावनिक आवाहन केले जाईल. मात्र त्यास बळी पडू नका. जिथे विकास दिसेल तिथेच मत द्या. विकासकाम करताना मी टोलवा टोलवीचे उत्तर देणार नाही. उद्या या, परवा या, अशी उत्तरे देणार नाही आणि मुंबईवरुन आल्यावर भेट, अशी उत्तरे तर अजिबात देणार नाही.

Lok Sabha Election 2024 | निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची दुसरी सरमिसळ संपन्न

Related Posts