IMPIMP

Ajit Pawar | मुख्यमंत्री साहेब तुमच्या वाचाळवीरांना जरा आवरा – अजित पवार (VIDEO)

by nagesh
 Ajit Pawar | ajit pawar said take revenge of uddhav thackeray by defeating eknath shinde and bjp in kasba chinchwad by election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) आमदार जितेंद्र आव्हाड प्रकरण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, ओला दुष्काळ आणि हर हर महादेव चित्रपटावरुन सुरु असलेला वाद आदी मुद्दे चर्चिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हे सरकार कश्या पद्धतीने आले आणि सुरु आहे, हे सर्वांना माहीत आहे. आता या सरकारमध्ये सर्व अधिकारी प्रचंड तणावाखाली काम करत आहेत. जितेंद्र आव्हाड (Jitnedra Awhad) प्रकरणात पोलिसांवर दबाव आहे. हे मला पोलिसांनी स्वत: सांगितले आहे. त्यांना थेट मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश दिले गेले आहेत. केवळ वरिष्ठांनी आदेश द्यायचे आणि खालच्यांनी काम करायचे, असा प्रकार सध्या सुरु आहे. जनतेचा विश्वास यामुळे कुठेतरी हरवत चालला आहे, असे पवार म्हणाले.

 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्याप्रकारे सरकार चालवित आहेत, ते साफ चुकीचे आहे. पोलिसांवरील विश्वास महत्वाचा आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांची भूमिका कणखरपणे मांडली पाहिजे. पोलीस दबावाला बळी पडत आहेत. त्यांनी त्याला विरोध केला पाहिजे. जर का असे सुरु राहिले, तर राज्याची स्थिती आणि चित्र पालटायला वेळ लागणार नाही. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात वाचाळवीर वाढले आहेत. त्यामुळे ते मनाला येईल ते बोलतात. त्यांच्या वक्तव्यांनी मंत्रिमंडळांची देखील बदनामी होती. ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी त्यांच्या पदाची तरी मर्यादा पाळली पाहिजे. पण कोणीही कसली देखील तमा बाळगत नाही. त्यांच्यावर चाफ असला पाहिजे, अशी विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी केली आहे.

 

 

मनस्तापाचा शिधा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. केवळ घोषणा केली गेली. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आम्ही केली आहे. त्यावर देखील कोणी काहीही दाद घेत नाही, असे यावेळी पवारांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड प्रकरणात पारदर्शक पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. तो प्रसंग आणि तक्रार यातील मधला काळ तपासला पाहिजे. यावेळी कोण कोण कोणाला भेटले याची चौकशी झाली पाहिजे. चौकशीअंती सर्व काही समोर येईल. त्यामुळे मी त्यावर जास्त काही बोलणार नाही, असे पवार यावेळी म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. ते कोणत्याही एका धर्माचे किंवा जातीचे नाहीत.
मी अद्याप हर हर महादेव चित्रपट पाहिला नाही. दिग्दर्शक इतिहासाची मोडतोड करुन काय साध्य करु
इच्छित आहेत? तुम्ही वातावरण का खराब करत आहात? सरकारने ठरविले तर ते यात हस्तक्षेप करु शकतात.
इतिहासात ज्याची नोंद आहे, ते तोडून वेगळे दाखविण्याचा कोणी प्रयत्न करु नये.
त्यांनी आपली चूक कबूल करुन तो चित्रपट मागे घ्यावा, असे यावेळी पवार म्हणाले आहेत.

 

 

Web Title :- Ajit Pawar Chief Minister Sir, please restrain your blabbermouths

 

 

हे देखील वाचा :

Pune Accident | पुण्यात दुर्दैवी घटना; ट्रॉलीच्या खाली येऊन गरोदर महिलेचा मृत्यू

Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार, चाकण परिसरातील घटना

 

 

Related Posts