IMPIMP

Ajit Pawar | संभाजीनगर राड्यात राष्ट्रवादीचा हात, अजित पवार भाजप खासदारावर संतापले, म्हणाले-‘वेगवेगळ्या पक्षांची नावं घेण्यापेक्षा चौकशी करा, होऊन जाऊद्या…’

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar big statement not speech in mahavikas aghadi vajramuth sabha nagpur

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राड्यात (Chhatrapati Sambhaji Nagar Incident) राष्ट्रवादीचा (NCP) हात
असल्याचे वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे (BJP MP Anil Bonde) यांनी केले होते. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज
पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. केंद्र (Central Government) आणि राज्य सरकार (State Government) तुमच्या ताब्यात आहे. त्यामुळे
संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्याचा तपास करा, होऊन जाऊद्या ‘दूध का दूध पानी का पानी’ असं अनिल बोडेंना सांगा. यावेळी अजित पवार (Ajit
Pawar) संतापल्याचे पाहायला मिळाले. राजकारण कोणत्या थराला जात आहे, असंही ते चिडून म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वेगवेगळ्या पक्षांची नावे घेण्यापेक्षा चौकशी करा

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, चौकशी करण्याचे काम हे पोलीस यंत्रणेचे आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्याबाबत वेगवगेळ्या पक्षांची नावं घेण्यापेक्षा याची चौकशी करावी. कोणी घडवलं? का घडवलं? याची चौकशी करावी. त्यामागचा सुत्रधार कोण आहे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजी. त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होता कामा नये असं पवार यांनी म्हटलं आहे.

 

 

जनतेच्या पैशातून जाहीरातबाजी

जनतेच्या पैशातून राज्य सरकारची जाहीरातबाजी सुरु असल्याचा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला. त्यांच्याकडे सध्या दुसरे कोणतेही मुद्दे राहिले नाहीत. एखाद्या योजनेची जाहीरात देऊन लोकांना माहिती दिली असेल तर ते ठिक आहे. पण सध्या जाहीरातबाजी सुरु असल्याचे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

 

 

सभेला प्रत्येकजण उपस्थित असेल असे नाही

प्रत्येक सभेला प्रत्येक जण उपस्थित असेल असे नाही. एक धोरण स्वीकारले आहे. प्रत्येक पक्षाचे दोन नेते बोलतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) हे कालच्या सभेला गैरहजर होते. यासंदर्भात अजित पवारांना विचारण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. भाषण झाल्यानंतर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) लगेच गेले होते. मात्र, त्यांना पुढे सुरतला जायचे असल्याने ते लवकर गेले. याबाबत त्यांनी आम्हाला सांगितले होते, असंही अजित पवार यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुढच्या सभेत फडणवीसांचे नाव घेतो

अजित पवार यांना एका पत्रकाराने विचारले की, तुम्ही आणि उद्धव ठाकरेंनी कालच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) यांचे नाव घेतले. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव घेतले नाही. त्यांच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे का? या प्रश्नला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, तुमची सूचना लक्षात घेतली. पुढच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन बोलणार. मला जर बोलायची संधी मिळाली तर फडणवीस यांचे नाव घेऊन भाषण करणार. तुमची सूचना अजित पवारने स्विकारली. नागपूरच्या सभेत मला बोलण्याची संधी मिळाली तर फडणवीस यांचे नाव घेऊन मी बोलेन, असं उत्तर देताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

 

 

जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा

पुण्यातील लोकसभा पोट निवडणुकीबाबत (Pune Lok Sabha Bypoll Election) महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेतील.
मात्र माझी विनंती आहे की आत्ताच त्या गोष्टीची चर्चा करु नका.
आजच मला चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा फोन आला होता की 7 एप्रिलला गिरीश बापट यांची श्रद्धांजली सभा आहे.
मला पहिला राग इतका आला, कारण आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यावेळी अस्थि विसर्जनही झालं नव्हतं.
काय आपण? निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहींचे. जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा.
सगळंच सोडलं का? तुमच्या-आमच्या घरात अशी दु:खद घटना घडली तर माणूस 13-14 दिवस गप्प बसतो.
महिनाभर गप्प बसलं तर बिघडलं कुठे? सारखं कोण उमेदवार देणार? कोण काय करणार?
भावी खासदार म्हणून काहींचे पोस्टर लागलेत अरे जरा लाज वाटली पाहिजे.
कुठे गुडघ्याला बाशिंग बांधून निघालात, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली.

 

 

Web Title :-  Ajit Pawar | ncp leader ajit pawar comment on chhatrapati sambhaji nagar bjp mp anil bonde

 

हे देखील वाचा :

MP Arvind Sawant | ‘रिक्षावाला’ शब्दावरुन अरविंद सावंत यांचा यु-टर्न, म्हणाले – ‘तो शब्द शरद पवारांचा नाही, तो शब्द…’

Maharashtra Politics News | ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता भाजपमध्ये जाणार’, शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एलके इलेव्हन, ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब संघांचे सलग विजय

 

Related Posts