IMPIMP

Maharashtra Politics News | ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता भाजपमध्ये जाणार’, शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

by nagesh
 Maharashtra Politics News | former chief minister ashok chavan will join bjp before lok sabha says shiv sena mla sanjay shirsat

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन- Maharashtra Politics News | महाविकास आघाडीची रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे ‘वज्रमूठ’ सभा (MVA Vajramuth Sabha) झाली. या सभेत काँग्रेसचे (Congress) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोक चव्हाण (Ashok Chavan), अजित पवार (Ajit Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप (BJP), केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. याच दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Shinde Group MLA Sanjay Shirsat) यांनी प्रत्यारोप करताना गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये (Maharashtra Politics News) प्रवेश करतील असे शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय शिरसाट म्हणाले, ही वज्रमूठ नव्हती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते उद्धव ठाकरेंची मजा घेण्यासाठी (Maharashtra Politics News) मंचावर एकत्र बसले होते. हे कधीही एक होणार नाहीत. त्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आले नाहीत. ते एवढे आजारी होते का की, सभेला आले नाहीत. आज तेच नाना पटोले सुरतला कोर्टात चालले आहेत. शिरसाट एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

संजय शिरसाट पुढे म्हणाले, काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही, अशोक चव्हाण आणि बाकीच्या नेत्यांचं पटत नाही, त्यांना काँग्रेसमध्ये चांगली वागणूक मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election-2024) अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

 

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी अनेक घडामोडी घडल्या आहेत.
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) भाजपमध्ये जाणार नाहीत.
कारण तिथे राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आहेत.
त्या दोघांचं विळ्या-भोपळ्याचे नातं आहे. विखे पाटील काँग्रेसमध्ये गेले, तर बाळासाहेब थोरात भाजपात जातील.
असं त्यांचं उलटंपालटं गणित आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत साशंकता आहे.
असं असलं तरी अशोक चव्हाणांची मानसिकता झाली असावी, ते निश्चितपणे भाजपमध्ये प्रवेश करतील असंही शिरसाट यांनी नमूद केलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-   Maharashtra Politics News | former chief minister ashok chavan will join bjp before lok sabha says shiv sena mla sanjay shirsat

 

हे देखील वाचा :

Pune Lok Sabha Bypoll Election | गिरीश बापटांचा वारसदार कोण? BJP कडून 5 नावं चर्चेत तर काँग्रेसचे ‘हे’ 2 नेते इच्छुक

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एलके इलेव्हन, ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब संघांचे सलग विजय

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! पुणे पोलिसचा सलग दुसरा विजय; इव्हॅनो इलेव्हन संघाची विजयी कामगिरी

 

Related Posts