IMPIMP

Ajit Pawar | चंद्रकांत पाटलांच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘मी फार छोटा माणूस..’

by nagesh
Chandrakant Patil | BJP leader chandrakant patil criticism of ajit pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुण्यातील (Pune) शाळा आणि कोरोना आढावा बैठकीवरुन (Corona Review Meeting) भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार बैठकीत विश्वासात घेत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच बैठकीत आम्ही केलेल्या सूचनांना ते केराची टोपली दाखवतात, त्यामुळे आपण बैठकीत सहभागी होत नसल्याचे पाटील यांनी म्हटले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या आरोपांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मी काय बोलणार

चंद्रकांत पाटील इतकी मोठी व्यक्ती आहे की त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल एका छोट्या अजित पवाराने टीका करणं काही बरोबर नाही. मोठ्या माणसांबद्दल मोठ्या माणसांनी बोलावं, मी अतिशय छोटा आहे, असा टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला.

 

 

GST परतावा मिळाला नाही

मागील काळात वन नेशन वन टॅक्स (One Nation One Tax) असा निर्णय झाला आणि जीएसटी आलं. त्याला आता पाच वर्षे झाली आहेत. त्या पाच वर्षाच्या काळात केंद्र ठराविक रक्कम राज्यांना देत होतं. ती आता बंद होणार आहे. सर्व राज्याच्या अर्थमंत्र्यांनी (Finance Minister) कोरोनाची दोन वर्षे कठीण गेली अर्थव्यवस्थेला (Economy) फटका बसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्या पाच वर्षामध्ये अजून दोन वर्षे वाढवावी अशी मागणी केली आहे. आता त्यावर काय निर्णय घेतात ते पहावं लागेल, असेही अजित पवार म्हणाले.

 

 

11 मार्चला अर्थसंकल्प मांडणार

11 मार्चला अर्थसंकल्प (Budget) मांडणार असल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी दिली. 28 फेब्रुवारीपासून अधिवेशनाला (Convention) सुरुवात होणार आहे. 1 फेब्रुवारीला संसदेचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर अर्थमंत्री जो अर्थसंकल्प मांडतील त्यानंतर प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री (CM), सहकारी यावर चर्चा करतात. त्यातून राज्याला किती सवलती, वेगवेगळ्या योजना राज्यासाठी देता येतील याबाबत चर्चा होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

उत्पन्नाचे स्त्रोत शोधावे लागणार

आम्ही राज्याच्या भांडवली खर्च किती आहे, मागील तिमाहीत किती उत्पन्न जमा झाले याची माहिती घेत आहोत.
राज्याला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत शोधावे लागणार आहे.
नवीन कोणते कर आगामी अर्थसंकल्पात वाढवण्यात येणार आहेत हे आत्ताच सांगता येणार नाही.
पण उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे, महसुलाची गळती रोखणे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar on bjp chandrakant patil

 

हे देखील वाचा :

Anil Awachat | ‘मुक्तांगण’चा आधारवड हरपला ! अवलिया डॉ. अनिल अवचट यांचे निधन

Dilip Walse Patil | दिलीप वळसे पाटलांचे पोलिसांना आवाहन, म्हणाले – ‘महिलांची सुरक्षा ही आपली जबाबदारी’

Mayor Murlidhar Mohol | महापौर मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा एकदा ‘कोरोना’चा संसर्ग

PAN-Aadhaar Link | SBI कडून 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! हे काम केलं नाही तर तुमची बँकिंग सेवा बंद होऊ शकते, जाणून घ्या

 

Related Posts