IMPIMP

Ajit Pawar | ‘अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होणार, पण…’ दीपक केसरकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

by nagesh
Ajit Pawar | ncp mahesh tapase on shinde faction deepak kesarkar statement over ajit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – अजित पवारांनी (Ajit Pawar) पहाटेच्या ऐवजी दुपारी शपथ घेतली असती तर ते मुख्यमंत्री (CM) असते, असं विधान भाजपचे आमदार प्रवीण पोटे (BJP MLA Pravin Pote) यांनी केलं होतं. त्यावर मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, अजित पवार शिंदे गटात (Shinde Group) आले तर आम्हाला आनंद होईल. राष्ट्रवादीत (NCP) त्यांची कशी घुसमट होतेय, हे सगळ्यांनी पाहिलं आहे असे केसरकर म्हणाले होते. दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) नक्कीच मुख्यमंत्री होतील असा विश्वास तपासे यांनी व्यक्त केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महेश तपासे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करुन दीपक केसरकर आणि आमदार प्रवीण पोटे यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, केसरकरजी आपण हे विसरलात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) राज्याच्या राजकारणाचे सिंह आहेत. ‘शेर अपना इलाका कभी नही छोडता’ म्हणून त्यांना कुठल्याही लांडग्या, कोल्ह्यांच्या टोळीमध्ये समाविष्ट होण्याची आवश्यकता नाही.

 

 

महेश पोटे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना तपासे म्हणाले, भाजपचे आमदार प्रवीण पोटे हे असे म्हणाले की, अजित पवारांनी जर सकाळच्या ऐवजी दुपारी शपथविधी घेतला असता तर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, पण ती वेळ आमची असले आणि पक्षही आमचा असेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले दिपक केसरकर?

प्रवीण पोटे यांच्या वक्तव्यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले, राजकीय नेत्यांची राजकारणापलीकडे
जाऊन एकमेकांशी मैत्री असते. एकमेकांबद्दल आदर असतो. आम्हा सगळ्यांना अजित पवार यांच्याबद्दल आदर आहे.
अजित पवारही कुटुंबातील सदस्यांप्रमाणे मोकळेपणाने बोलतात.
त्यामुळे मला वाटतं की, प्रवीण पोटे यांनीही मैत्रीपोटी किंवा आदरापोटी ते विधान केले असावं.
अजित पवार आमच्या सगळ्यांबरोबर आले तर आम्हाला आनंदच होईल. राष्ट्रवादीमध्ये त्यांची कशी घुसमट होतेय, हे सगळ्यांनी बघितले आहे. त्यामुळे असा उमदा नेता आमच्याबरोबर आला तर का आवडणार नाही, असे केसरकर म्हणाले होते.

 

Web Title :- Ajit Pawar | ncp mahesh tapase on shinde faction deepak kesarkar statement over ajit pawar

 

हे देखील वाचा :

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमन दिल्लीच्या AIIMS मध्ये दाखल

Winter Session | ‘त्यांना टोमणे मारण्याची सवय, फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही’, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर शिंदे गटाचा पलटवार

Nysa Devgan | न्यासा देवगणचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नेटकरी करत आहेत ट्रोल

 

Related Posts