IMPIMP

Ajit Pawar | स्विमिंग पूलमध्ये खेळाडूंबरोबरच नागरीकांनाही आता मुभा (व्हिडीओ)

by nagesh
Ajit Pawar | will theaters and cinemas state start operating 100 cent capacity

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | मागील काही महिन्यात पुण्यात (Pune) कोरोनाचा प्रभाव अधिक होता. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने येथील अनेक निर्बंध शिथिल करण्यात आली आहेत. अनेक व्यवहार देखील सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. तर स्विमिंग पुलमध्ये इतर नागरिकांना परवानगी नव्हती. केवळ स्विमिंग पूल (Swimming pool) खेळाडूंना दोन डोसच्या अटींवर मुभा दिली होती. मात्र, याबाबत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्वपुर्ण माहिती दिली आहे. खेळाडूंबरोबरच आता इतर नागरिकांनाही स्विमिंग पूल मध्ये परवानगी असल्याचं ते म्हणाले. तसेच त्याच्यासाठीही कोरोना प्रतिबंधक दोन डोसची अट असणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

अजित पवार (Ajit Pawar) हे आज (शुक्रवारी) पुण्यातील कोरोना आढावा बैठकीसाठी आले होते. बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, सध्या पुण्यात 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार पडला आहे. मात्र, रक्ताचं खूप शॉर्टेज जाणवत होत. डॉक्टर, हॉस्पिटलकडूनही मागणी होत होती. मागच्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रक्तदान शिबिरे राबवण्यात आली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढं यावं असं ते म्हणाले.

दरम्यान, जिल्ह्यात लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढला आहे. ग्रामीण भागातही नागरिक आवर्जून लस घेण्यासाठी जात आहेत.
परंतु बऱ्याच ठिकाणी मास्क वापरलं जात नाही. कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. सर्वांना मास्कची नितांत गरज आहे.
पोलिसांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तशा सूचनाही पोलीस, आणि अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचं अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | players will be allowed swimming pool well others information ajit pawar in pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जाहिरातीच्या 35 फूट उंचीच्या होर्डिंगवरुन तरुणाने मारली उडी, पुण्यातील घटना

Pune Police | आता पुण्यातही महिला पोलिसांना आठ तासांची ड्युटी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,933 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Tata Group | जेफ बेजोस यांची अमेझॉन आणि अंबानींच्या जिओमार्टला टक्कर देणार टाटाचे हे सुपरअ‍ॅप, नवीन वर्षात होणार लाँच

 

Related Posts