IMPIMP

Ajit Pawar | ‘अजित पवारांचं वक्तव्य हे फूलस्टॉप नसून कॉमा, अजूनही काहीही होऊ शकतं’

by nagesh
Ajit Pawar | shivsena naresh mhaske and uday samant on ajit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याची चर्चा सुरु होती. ते
राष्ट्रवादीच्या 40 आमदारांना (NCP MLA) सोबत घेऊन भाजपला (BJP) पाठिंबा देतील, असंही बोललं जात होत. मात्र, त्यावर अजित पवारांनी
स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. मी बंडखोरी करणार असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, जिवात जीव असेपर्यंत मी
राष्ट्रवादीसोबत काम करणार असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उदय सामंत यांचं सूचक विधान

राज्याचे मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, चर्चांना पूर्णविराम द्यायचा असला तरी याची सुरुवात आता झालेली आहे. अजित पवारांनी आमची भूमिका मान्य करावी. जर ही भूमिका मान्य नसेल तर त्याचं काय करायचं हे आमचे वरिष्ठ ठरवतील. अजित दादांचे आजे जे काही वक्तव्य आहे ते माझ्यासाठी फुलस्टॉप नसून कॉमा आहे. यापुढे अजूनही काहीही घडू शकतं, असं सूचक विधान उदय सामंत यांनी केले आहे.

 

तसेच गेल्या काही दिवसांत राज्यात जे काही वातावरण आहे, कोण गायब आहे, कुणाचे फोन बंद आहेत या सगळ्यावरुन लक्ष हटवण्यासाठी अजित पवार महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) कार्यक्रमाचा विषय घेत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

 

अमोल मिटकरींचं मोठं विधान

अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी मोठं विधान केलं आहे. 2019 साली महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी ज्याप्रकारे पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग केला होता, त्या प्रकारे शिंदे गटाच्या नेत्यांच्या मनातील मळमळ बाहेर काढण्यासाठी हा प्रयोग होता, असं समजा, असं मिटकरी म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Ajit Pawar | shivsena naresh mhaske and uday samant on ajit pawar

 

हे देखील वाचा :

MahaDBT | ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

Maharashtra Political News | अजित पवारांनी संजय राऊतांना का सुनावलं?, संजय शिरसाटांनी सांगितले कारण, म्हणाले…

Ajit Pawar | ‘तर अजित पवारांनी आधीच खंडन केलं असतं, पण…’ अजित पवारांच्या भूमिकेवर शिंदे गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया

Mahila Samman Yojana in MSRTC Bus | महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात 17 लाखाहून अधिक महिला प्रवाशांनी घेतला लाभ

 

Related Posts