IMPIMP

Maharashtra Political News | अजित पवारांनी संजय राऊतांना का सुनावलं?, संजय शिरसाटांनी सांगितले कारण, म्हणाले…

by nagesh
Maharashtra Political News | sanjay shirsat says ajit pawar slams sanjay raut over saamana editorial

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political News | विरोधी पक्षनेते (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार असणाऱ्या सर्व
चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, कारण नसताना माझ्याबद्दल आणि माझ्या काही सहकाऱ्यांबद्दल
गैरसमज निर्माण (Maharashtra Political News) करण्याचे काम केलं जात आहे. वास्तविक ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत, यामध्ये काहीही
तथ्य नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी अजित पवार यांनी अफवा पसरवणाऱ्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. यामध्ये पवारांचा रोख हा भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील (Shiv Sena Shinde Group) नेत्यावर होता. याबद्दल आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) म्हणाले की, आम्ही वक्तव्य करताना शांत डोक्याने केलं होतं. केवळ जर-तरची भाषा वापरली. (Maharashtra Political News) आम्ही म्हणालो की, अजित पवार आले तर आम्ही स्वागत करु, त्यांना राष्ट्रवादी (NCP) नसेल सोडायची तर तो त्यांचा प्रश्न आहे.

 

शिरसाट पुढे म्हणाले, त्यांच (ठाकरे गट -Thackeray Group) मुखपत्र असलेल्या ‘सामना’चा रोख पवारांच्या घरातल्या भांडणावर होता. त्यामुळे अजित पवारांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) चिड व्यक्त केली. संजय राऊतला त्यांनी तडकवलं आहे. अजित दादांबद्दल बोलायचा अधिकार राऊतांना कोणी दिला. संजय राऊत ठरवणार का? अजित दादांनी काय केलं पाहिजे काय करु नये. म्हणूनच अजितदादांनी आज सडकून उत्तर दिलंय. यानंतर संजय राऊत ध्यानावर येतील, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.

 

 

काय म्हणाले अजित पवार?

इतर पक्षाच्या नेत्यांकडून अजित पवार भाजपमध्ये जाणार अशी वक्तव्ये केली जात आहेत त्यांचाही समाचार अजित पवार यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले, इतर पक्षांचे प्रवक्ते सुद्धा (Spokesperson) राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखं बोलतायत. तुम्ही ज्या पक्षाचे प्रतिनीधीत्व करता त्याबद्दल बोला. तुम्ही ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल बोला. तुम्ही आम्हाला कोट करुन काहीही बोलू नका. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र दुसऱ्याने घेण्याचं कारण नाही, अशा शब्दात अजित पवारांनी संजय राऊतांना सुनावलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Maharashtra Political News | sanjay shirsat says ajit pawar slams sanjay raut over saamana editorial

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘तर अजित पवारांनी आधीच खंडन केलं असतं, पण…’ अजित पवारांच्या भूमिकेवर शिंदे गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया

Mahila Samman Yojana in MSRTC Bus | महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात 17 लाखाहून अधिक महिला प्रवाशांनी घेतला लाभ

Yashwant Sahakari Sakhar Karkhana in Kunjirwadi, Pune | यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना निवडणूक निधी जमा करण्याचे आवाहन

Iron Hoarding Collapses In Pune’s Pimpri Chinchwad | होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 3 लाख रुपये

 

Related Posts