IMPIMP

Amazon | धक्कादायक गौप्यस्फोट ! पुलवामा हल्ल्यासाठी वापरलेल्या रसायनांची Amazon वरुन खरेदी, CAIT चा गंभीर आरोप

by nagesh
Amazon | shocking assassination amazon purchase chemicals used pulwama attack serious allegations cait demand marathi news policenama

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स म्हणजे (CAIT) ने दिग्गज ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनवर (Amazon) गंभीर आरोप (serious allegation) केला आहे. अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवरुन गांजा (Marijuana) सारख्या पदार्थांची विक्री होणे हा काही पहिला गुन्हा नाही आहे. तर 2019 मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये (Pulwama terrorist attack) दहशतावद्यांनी ज्या रसायनाचा वापर बॉम्ब तयार करण्यासाठी केला होता. ते देखील अ‍ॅमेझॉनच्या (Amazon) संकेतस्थळावरुन खरेदी करण्यात आले होते. त्याचाच वापर करुन दहशतवाद्यांनी इम्प्रोव्हाईज्ड एक्स्पोसिव्ह (Improvised Explosive) तयार केले, असा दावा CAIT ने केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अ‍ॅमेझॉनवरून अमोनियम नायट्रेड खरेदी
2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्महघातकी दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे (CRPF) 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) आपल्या रिपोर्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली होती. अ‍ॅमेझॉनने दहशतवाद्यांनी खरेदी केलेल्या रसायनांची सविस्तर माहिती तपास यंत्रणांना दिली होती. यानंतर अ‍ॅमेझॉनच्या (Amazon) मदतीनेच तपास यंत्रणांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. या दहशतवाद्यांनी अ‍ॅमेझॉनवरुन भारतात बंदी असलेले अमोनियम नायट्रेड खरेदी केले होते.

 

 

CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले…
CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीय (B.C. Bhartiya) आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल (Praveen Khandelwal) यांनी सांगितले की, एनआयएकडून (NIA) अटक व्यक्तींची ज्यावेळी चौकशी करण्यात आली, तेव्हा त्यांनी ही स्फोटके तयार करण्यसाठी अ‍ॅमेझॉनवरुन आयईडी (IED), बॅटरी (battery) आणि अन्य सामान खरेदी केल्याचे कबूल केले. तसेच फॉरेंसिक तपासामध्येही हल्ल्यासाठी बॉम्ब तयार करताना अमोनियम नायट्रेड, नायट्रोग्लिसरिन यांचा वापर करण्यात आला होता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा
दरम्यान, आमच्या जवानांविरोधात लढण्यासाठी दहशतवाद्यांनी प्रतिबंधित सामुग्री अमोनियम नायट्रेड ऑनलाइन माध्यमातून सहजपणे खरेदी केले. तसेच त्याचा वापर देशविरोधात केला. त्यामुळे हे पदार्थ विक्री करणाऱ्या अ‍ॅमेझॉनवर देशद्रोहाचा गुन्हा (FIR) दाखल करावा, अशी मागणी CAIT ने केली आहे.

 

Web Title :- Amazon | shocking assassination amazon purchase chemicals used pulwama attack serious allegations cait demand marathi news policenama

 

हे देखील वाचा :

Pathankot | पठाणकोट : सैन्याच्या छावणीजवळ ग्रेनेड हल्ला; पंजाबासह सर्वत्र हायअलर्ट जारी

Pune Crime | फुकट बिर्याणी न दिल्याने हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार; पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातील घटना

Nawab Malik | ‘कबूल है, कबूल है, कबूल है…’ ! नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर मध्यरात्री ‘फोटोबॉम्ब’

 

Related Posts