IMPIMP

Ambadas Danve | बेळगाव सीमा वादाप्रमाणे मराठवाडा देलगुरचा प्रश्नावरही ठराव करावा; कामकाज सल्लागार समिती बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

by nagesh
Ambadas Danve | Like the Belgaon border dispute, the Marathwada Delgur issue should also be resolved; Opposition leader Ambadas Danve's demand in the working advisory committee meeting

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Ambadas Danve | बेळगाव सीमावाद ठरावाप्रमाणे मराठवाडयातील देलगुरमधील प्रश्न सोडवण्यासाठी या हिवाळी अधिवेशनात चर्चा करायला हवी, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कामकाज सल्लागार समिती बैठकीत केली. (Ambadas Danve)

 

मराठवाड्यातील देलगुरमधील नागरिक तेलंगणात जाण्याची मागणी करत आहेत. त्या नागरिकांच्या वीज व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा व्हायला हवी, असे दानवे यांनी म्हटले. विरोधी पक्षनेत्यांची मागणी विचारात घेऊन अधिवेशनकाळात नागपूर येथे प्रश्न उपस्थित करण्याचे यावेळी मान्यवरांकडून सुचवण्यात आले. (Ambadas Danve)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. ज्याप्रमाणे केंद्राने तेलंगणात सांस्कृतिक कार्यक्रम केले,
त्याच धर्तीवर मराठवाड्यात कार्यक्रम घेण्यात यावे अशी मागणीही दानवे यांनी केली.
त्यावर आपल्या राज्यातही केंद्राकडून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

 

या बैठकीला उपसभापती निलमताई गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, शेकापचे नेते व आमदार जयंत पाटील, शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील,
परिषद सदस्य विलास पोतनीस आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Web Title :- Ambadas Danve | Like the Belgaon border dispute, the Marathwada Delgur issue should also be resolved; Opposition leader Ambadas Danve’s demand in the working advisory committee meeting

 

हे देखील वाचा :

Sushma Andhare On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांना शिवरायांबद्दल द्वेष, आकस; पुण्यात सुषमा अंधारेंचा घणाघात

Rajesh Tope | ‘शरद पवारांच्या केसालाही धक्का लागता कामा नये; ही राज्य सरकारची जबाबदारी’ – राजेश टोपे

Pune Crime | जेवायला गेले अन् चोरट्यांनी घर साफ केले, बाणेर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये भरदिवसा 66 लाखांची घरफोडी

 

Related Posts