IMPIMP

Amol Kolhe | स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडूच खरे प्रेरणास्थान – अमोल कोल्हे

by nagesh
Amol Kolhe | The real inspiration is the players who participated in the competition - Amol Kolhe

दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्धघाटन संपन्न

 

 

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Amol Kolhe | महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग (Social Justice & Special Assistance Department) दिव्यांग कल्याण आयुक्तालय व श्री समर्थ व्यायाम मंडळ इंदापूर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला आणि मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आज रोजी शानदार उद्धघाटन करण्यात आले. तीन दिवस चालणार्‍या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून २२१५ मूकबधिर, मतिमंद, आष्टी व्यंग, अंध विद्यार्थी सहभागी झाले आहेत. (Amol Kolhe)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा मैदान महाळुंगे बालेवाडी येथे स्पर्धेचा उद्धघाटन सोहळा पार पडला. स्पर्धेचे उद्धघाटन राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री समर्थ व्यायाम मंडळ, इंदापूरचे अध्यक्ष आणि स्पर्धेचे निमंत्रक प्रदीप गारटकर आणि दिव्यांग कल्याण उपाायुक्त संजय कदम, समाज कल्याण पुणे प्रादेशिक उपायुक्त बी.ए. सोळंकी, समाज कल्याण पुणेचे अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, दिव्यांग कल्याण उपायुक्त संजय कदम (Sanjay Kadam) आदि मान्यवर उपस्थित होते.

 

जीवनामध्ये विविध वळणांमध्ये अनेक संकटे येत असतात, अपयश येत असतात. पण अशा या संकटे आणि अपयशने खचून जाता त्याचा धैर्याने सामना करण्याची गरज असते. सामन्य माणसे आयुष्यामध्ये अनेक वेळा निराश होतात आणि लढायची उमेद हरवून बसतात. आज या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या या दिव्यांग मुला-मुलींचा उत्साह पाहून मी थक्क झालोय. तुमच्याकडून ही प्रेरणा घेण्यासारखी असून तुम्हीच आमचे खरे प्रेरणा स्थान आहात, अशा शब्दांमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

स्पर्धेचे निमंत्रक प्रदीप गारटकर म्हणाले की, २० वर्षांनंतर पुणे जिल्ह्यामध्ये आयोजित या स्पर्धेत पुणे जिल्ह्यासह मुंबई शहर, पालघर, रत्नागिरी, रायगड, बीड, जळगाव, जालना, नागपूर, अहमदनगर, सांगली, हिंगोली, यवतमाळ, अकोल, वर्धा, कोल्हापूर, लातूर, नाशिक, सिंधदूर्ग, अमरावती, सातारा, उस्मानाबाद, चंद्रपूर, सोलापूर, भंडारा, परभणी, ठाणे, नंदूरबार, धुळे, बुलढाणा, गोंदिया, वाशिम, नांदेड, औरंगाबाद आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधून दिव्यांग खेळाडू सहभागी झाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

स्पर्धेमध्ये सहभागी ३६ जिल्ह्यातील खेळाडूंच्या संचलनाव्दारे सोहळ्यास सुरूवात करण्यात आली.
त्यानंतर प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते क्रिडा ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले.
यानंतर पुणे येथील मुक-बधीर शाळेतील मुलांनी संगीतनृत्य आणि समूहगान सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

 

श्री शिवछत्रपती क्रीडा मैदान महाळुंगे बालेवाडी येथे होणार्‍या या स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स्- धावणे, लांब उडी, गोळा फेक,
व्हिलचेअर बसून गोळा फेक, बादलीत बॉल टाकणे, जलतरण (फ्री स्टाईल), पासिंग द बॉल, बुद्धीबळ असे
वैयक्तिक क्रिडा स्पर्धा होणार आहे. वैयक्तिक क्रिडा स्पर्धा ८ ते १२, १२ ते १६, १७ ते २१, २२ ते २५ या
वयोगटात होणार आहेत.

 

 

Web Title :- Amol Kolhe | The real inspiration is the players who participated in the competition – Amol Kolhe

 

हे देखील वाचा :

Valentine’s Day | प्रेमासाठी ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी केली हद्द पार; कोणाकोणाचा आहे समावेश

Pune Crime News | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर वार, पतीला अटक; बालेवाडी परिसरातील घटना

Jalgaon Crime News | जळगावमध्ये तापी नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

 

Related Posts