IMPIMP

Pune Crime News | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर वार, पतीला अटक; बालेवाडी परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Suspect of character, assault on wife, arrest of husband; Incidents in Balewadi area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Suspicion of Character) घेऊन पत्नीवर लोखंडी शस्त्राने वार केल्याची घटना पुणे शहरातील बालेवाडी (Balewadi) परिसरात घडली आहे. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी (Pune Crime News) चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police) पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक (Arrest) केली आहे. या घटनेत पत्नीला 14 टाके पडले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत 30 वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश राजाराम डिंबळे Ganesh Rajaram Dimble (वय 37 रा. थेरगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.13) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घडली. (Pune Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचे बारा वर्षापूर्वी लग्न झाले असून त्यांना दोन मुली आहेत. कौटुंबिक वादामुळे (Family Dispute) ते दोघे विभक्त राहतात. आरोपी गणेश हा चालक म्हणून काम करतो. तर फिर्यादी या एका ट्रॅव्हल्स कंपनीत कामाला आहेत. आरोपी गणेश हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे त्यांच्या वाद हो होते. सोमवारी सायंकाळी तो पत्नी काम करत असलेल्या परिसरात आला होता.

 

त्याचवेळी फिर्यादी या त्यांच्या ऑफिसमधील एका सहकाऱ्यासोबत चहा घेण्यासाठी चौकात आल्या होत्या.
हे गणेशला दिसल्यानंतर त्याने पत्नीसोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्याला शिवीगाळ करुन पत्नीच्या मानेवर,
डोक्यावर लोखंडी शस्त्राने वार केले. त्यावेळी संबंधीत सहकाऱ्याने हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी
गणेश याने त्यालाही जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली.

 

या घटनेनंतर फिर्यादी पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी गणेश याच्या विरुद्ध खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा दाखल
करून त्याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे (API Rajkumar Kendre) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Suspect of character, assault on wife, arrest of husband; Incidents in Balewadi area

 

हे देखील वाचा :

Yavatmal Crime News | नुकतीच बदली होऊन आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ

Jalgaon Crime News | जळगावमध्ये तापी नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

 

Related Posts