IMPIMP

Amol Mitkari | ‘मलिकांवर आरोप करणाऱ्या फडणवीसांनी लाड यांच्या कन्येच्या लग्नात कोणाशी हात मिळवला होता?’ – अमोल मिटकरी

by nagesh
Amol Mitkari | NCP leader amol mitkari criticized bjp on roadshow of devendra fadnavis in nagpur today

सरकारसत्ता ऑनलाइन – Amol Mitkari | राजकारणात सध्या सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर अंडरवर्ल्डशी संबंध (Underworld) असल्याचे आरोप करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावरून ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session 2022) हा मुद्दा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावरून सरकारला धारेवर धरलं. दुसरीकडे (Amol Mitkari) राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मलिकांनी दाऊदच्या बहिणीला पैसे दिले, तो मंत्री जेलमध्ये आहे मात्र तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही असं भारताच्या इतिहासात कधी घडलेलं नाही, असं फडणवीस म्हणाले. याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी मालेगाव बॉम्ब स्फोट (Malegaon Bomb Blast) प्रकरणावरून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर कोण आरोप करत आहे. याच देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या कन्येच्या विवाहावेळी कर्नल पुरोहित यांच्याशी हस्तांदोलन केलं होतं. कर्नल पुरोहित (Colonel Purohit) हे मालेगाव बॉम्ब स्फोटातीलव मुख्य आरोपीा आहेत. मात्र आता पुरोहित यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नसल्याचं फडणवीस सांगतात. मग मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप कुठे सिद्ध झालेत?, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, भाजपला (BJP) प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही छातीचा कोट करून लढू.
भाजपला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत.
भाजपने कितीही फ्रंटफूटवर येऊन बँटिंग करू दे, आमचे फुलटॉस बॉल तयार आहेत.
त्यामुळे भाजपला करारा जवाब मिळेल,
अशा शब्दात मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला.

 

 

Web Title : Amol Mitkari | ncp leader mla amol mitkari slams devendra fadnavis over colonel purohit meet in prasad lad daughter wedding

 

हे देखील वाचा :

YouTube Earnings | 1 लाख रुपये महिना कमवा YouTube द्वारे, ते सुद्धा केवळ 3 मिनिटे काम करून

Best Time To Drink Coffee | सकाळी-दुपार-संध्याकाळ कोणत्या वेळी कॉफी पिणे असते योग्य, अशाप्रकारे प्यायल्यात तर मिळतील फायदे

Iron Deficiency | रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान ! निरोगी शरीरात किती रक्त असावे, ही कमतरता वेगाने पूर्ण करतील ‘या’ 8 वस्तू

 

Related Posts