IMPIMP

Andheri East Bypoll Election | अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा ‘हात’ शिवसेनेच्या पाठीशी, शिंदे गटाला दिले ओपन चँलेंज

by nagesh
Maharashtra Political News | all remaining 13 mlas of thackeray faction in touch with cm eknath shinde says uday samant

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election) आता शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना रंगणार आहे. काँग्रेसने (Congress) या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याची घोषणा केली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. यापूर्वी राष्ट्रवादीने (NCP) शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजप-शिंदे गट (Shinde Group) विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाना पटोले म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली होती. राज्यात अडीच वर्षे या महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) होतं. या सरकारने शेतकरी कर्जमाफी सारखे अनेक निर्णय घेतले. कोरोनासारख्या महाभयंकर संकटकाळात देशात सर्वोत्तम काम केले. पण सत्तापिपासू भाजपने ईडी (ED), सीबीआय (CBI) या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करुन शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडीचे सरकार पाडले. महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवेसेना पक्ष फोडला, अशी टीका पटोले यांनी केली.

 

भाजपविरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे
त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला
उमेदवार देणार नसून शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते
आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील असेही नाना पटोले म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Andheri East Bypoll Election | maharashtra politics andheri east bypoll election congress support shivsena candidate in upcoming andheri east bypoll election

 

हे देखील वाचा :

Chandrakant Khaire | ‘दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने 52 कोटी वाटले’, चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक आरोप

Chandrashekhar Bawankule | ‘उद्धव ठाकरेंचा संयम सुटलाय, ते बावचळलेल्या अवस्थेत’, चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा नवा फंडा; अ‍ॅमेझॉनच्या लिंकवरुन टास्क देऊन तरुणीला घातला सव्वा लाखांना गंडा

 

Related Posts