IMPIMP

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा नवा फंडा; अ‍ॅमेझॉनच्या लिंकवरुन टास्क देऊन तरुणीला घातला सव्वा लाखांना गंडा

by nagesh
Pune Cyber Crime | Cyber Thieves' New Fund of Fraud; By paying tax through the link of Amazon, the girl was cheated for half a million

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Cyber Crime | सायबर चोरटे लोकांना फसविण्यासाठी नवनवीन युक्त्या करीत असतात. एखादी युक्ती बाबत
पोलीस, बँकांनी जनजागृती केली की, हे चोरटे नवी युक्ती लढवून नव्याने लोकांना गंडा घालत असतात. आता त्यांनी एक नवा फंडा वापरला आहे.
वेगवेगळा टास्क देऊन तो पूर्ण केला तर कमिशन मिळेल असे सांगून अ‍ॅमेझॉन (Amazon) पेजवर रिचार्ज करायला लावून एका तरुणीला १ लाख १३
हजार रुपयांना गंडा (Fraud Case) घातला आहे. (Pune Cyber Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत नागपूरच्या २३ वर्षाच्या तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९५१/२२) दिली आहे. त्यानुसार
डायना स्पेन्सर (Diana Spencer) नावाच्या महिलेवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दादरा नगर हवेली येथे नोकरीला असून त्या पुण्यात त्यांच्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. ३ ऑक्टोबर रोजी त्यांच्या इंटाग्राम (Instagram) अकाऊंटवर अ‍ॅमेझॉनची लिंक (Amazon Link) आली. त्यामध्ये ई कॉमर्सच्या (E Commerce) माध्यमातून इन्व्हेसमेंट (Investment) करा व पैसे कमवा असे लिहिले होते. तेव्हा त्यांनी त्यावर क्लिक केले. त्यानंतर त्यांना एका मोबाईलवरुन मेसेज आला व त्यांना सर्व रजिस्ट्रेशन प्रक्रिया समजून सांगितली. त्यामध्ये लॉग इन करुन तुम्ही जर रिचार्ज केले तर तुम्हाला तुमचे कमिशन तुमच्या खात्यात जमा केले जाईल, असा मेसेज केला. एक पेज ओपन झाले. त्यामध्ये त्यांनी सर्व माहिती भरुन त्यावर त्यांनी रजिस्ट्रेशन केले. जसे त्यांनी लॉग इन केले, त्यांच्यासमोर एक अ‍ॅमेझॉनचे पेज ओपन झाले. त्यामध्ये त्यांना सुरुवातीला रिचार्ज करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी सुरुवातीला त्या पेजवरुन २०० रुपये रिचार्ज केले. त्यानंतर त्यांच्या खात्यात लगेच ४०० रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. म्हणून त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी एक टास्क दिला. (Pune Cyber Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्यामध्ये त्यांना आणखी रिचार्ज करायला सांगितले. तेव्हा त्यांनी पुन्हा ५०० रुपयांचे रिचार्ज केले व
त्यांच्या खात्यात ९६० रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. अशा प्रकारे त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला.
त्यानंतर त्यांना पुन्हा १ हजार रुपयांचा रिचार्ज करण्यास सांगितले.
त्यांनी रिचार्ज केल्यानंतर तेव्हा त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.
म्हणून फिर्यादी यांनी विचारणा केल्यावर त्यांना तुम्हाला टॉपअप मारल्यानंतर तुमचे कमिशन तुमच्या खात्यात जमा करणार म्हणून त्यांनी पुन्हा १ हजार रुपयांचे टॉपअप मारले.
तरीही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यानंतर त्यांना वारंवार रिचार्ज करायला सांगितले.
त्याप्रमाणे त्या रिचार्ज करीत गेल्या.
प्रत्येक वेळी काहीतरी कारण सांगून त्यांना पुन्हा रिचार्ज करण्यासाठी सांगत होते.
काहीही न करता पैसे मिळणार असे वाटल्याने त्या त्यांना भुलल्या व रिचार्ज करीत गेल्या.
अशा प्रकारे त्यांनी तब्बल १ लाख १३ हजार १३७ रुपयांचे रिचार्ज दुपारी २ ते साडेपाच वाजेच्या दरम्यान मारले.
तेव्हा त्यांना आपली फसवणुक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

 

 

Web Title :- Pune Cyber Crime | Cyber Thieves’ New Fund of Fraud; By paying tax through the link of Amazon, the girl was cheated for half a million

 

हे देखील वाचा :

Dasara Melava 2022 | शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यात आणखी एक धक्का, खासदार, आमदार करणार सीमोल्लंघन, शिंदे गटाच्या खासदाराचा मोठा दावा

Latur Crime | नवविवाहितेला मनोरुग्ण ठरवून छळ करणार्‍या पुण्यातील सासरकडील ८ जणांवर FIR

Jalgaon ACB Trap | तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी 4 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यासह खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts