IMPIMP

Chandrashekhar Bawankule | ‘उद्धव ठाकरेंचा संयम सुटलाय, ते बावचळलेल्या अवस्थेत’, चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका

by nagesh
Chandrashekhar Bawankule | 'Our clan is Hindutva, you are your clan..', Uddhav Thackeray's 'that' criticism of Bavan clans' counterattack (Video)

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबईत आज दोन दसरा मेळावे (Dasara Melava 2022) होत आहे. या अनुषंगाने राजकीय घडामोडी वाढल्या
असताना त्याची चर्चा सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे. दोन्ही गटांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज
सकाळपासूनच एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दोन्ही बाजूंची नेतेमंडळी दिसत आहेत. मात्र, यामध्ये आता भाजपने (BJP) उडी घेत शिवसेनेवर (Shivsena) खोचक टोला लगावला आहे. आधी प्रवक्ते केशव उपाध्ये (Spokesperson Keshav Upadhyay) आणि आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सामनातील अग्रलेखावरुन उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, उद्धव ठाकरे जे लिहितात, किंवा त्यांच्या मनात जे आहे, ते सामनातून (Saamana) बाहेर येते. बावचळलेल्या परिस्थितीतून ते बोलतात. सत्ता गेल्यामुळे त्यांचा संयम सुटला आहे. सत्ता गेल्यावर देखील संयम सोडायला नको. उद्धव ठाकरे हे सामनातून आपला संयम दाखवत आहेत, असे म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंनी सामनातून केलेल्या टिकेवर पलटवार केला आहे. तसेच, आज देखील, उद्धव ठाकरेंची टोमणी सभा होणार असल्याचे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका केली.

 

 

काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात?

 

पुढच्या पिढीला कळणार देखील नाही की, भाजप नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता व तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता. ‘खोके’वाल्यांचा अधर्म या निष्ठा पुढे कसा टिकेल? जेथे धर्म तेथे जय! शिवतीर्थाच्या रणमैदानावर धर्म आहे! त्यामुळे जय नक्की आहे, असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि शिंदे गटावर (Shinde Group) टीकेचे बाण सोडले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | uddhav thackeray speaks from a troubled situation lost his patience after losing power says chandrashekhar bawankule

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा नवा फंडा; अ‍ॅमेझॉनच्या लिंकवरुन टास्क देऊन तरुणीला घातला सव्वा लाखांना गंडा

Dasara Melava 2022 | शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यात आणखी एक धक्का, खासदार, आमदार करणार सीमोल्लंघन, शिंदे गटाच्या खासदाराचा मोठा दावा

Latur Crime | नवविवाहितेला मनोरुग्ण ठरवून छळ करणार्‍या पुण्यातील सासरकडील ८ जणांवर FIR

 

Related Posts