IMPIMP

Anil Deshmukh | अखेर अनिल देशमुख 1 वर्ष, 1 महिना आणि 27 दिवसांनी तुरुंगाबाहेर, ढोल ताशाचा गजर, फुलांची उधळण; कार्यकर्त्यांचा जल्लोष

by nagesh
Anil Deshmukh | anil deshmukh cbi court issues release order after hc refuses to stay bail

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) तब्बल 1 वर्ष, 1 महिना आणि 27 दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) प्रकरणात मागील अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी (Bail) प्रयत्न सुरु होते. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आधी ईडी प्रकरणात आणि नंतर सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर झाला. परंतु, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यासाठी वेळ मागितल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला होता. अखेर बुधवारी ते तरुंगाबाहेर आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या स्वागतासाठी त्यांचे कुटुंबिय तुरुंगाबाहेर आले होते. तसेच राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil), सुप्रिया सुळे (Supriya Sule), छनग भुजबळ (Chhang Bhujbal) आणि दिलीप वळसे-पाटील (Dilip Valse-Patil) हे देखील याठिकाणी उपस्थित होते. अनिल देशमुख बाहेर येणार हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्यांनी एकच जल्लोष केला. तसेच आर्थर रोड तुरुंगाबाहेर (Arthur Road Jail) मोठ्या प्रमाणात जमले होते. देशमुख यांच्या नागपूर येथील घराबाहेर कार्यकर्त्यांनी जोल्लोष केला.

 

 

मला खोट्या आरोपात फसवलं
मला खोट्या आरोपांमध्ये फववण्यात आले आहे. परमबीर सिंह (IPS Param Bir Singh) यांनी माझ्यावर शंभर कोटी रुपयांचा आरोप लावला. पण त्याच परमबीर सिंह यांनी कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं. त्यामध्ये मी ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप केला होता, माझ्याकडे कोणताही पुरावा नाही असं प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर दिली. त्याशिवाय न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देशमुख यांच्या वकिलांचा युक्तिवाद
सीबीआय प्रकरणात एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने (M.S. Karnik Bench) अनिल देशमुखांना जामीन मंजुर केला.
या प्रकरणात 100 कोटी वसुलीचे खोटे आरोप देशमुखांवर केल्याचा युक्तीवाद देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी (Adv. Vikram Chaudhary) यांनी केला होता.
या प्रकरणात कुठलाही पुरावा नसताना आरोप करण्यात आले.
याप्रकरणात 2021 मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर एप्रिल 2022 मध्ये बेकायदशीरपणे देशमुख यांना अटक केली.
परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांनी देशमुख यांना अडकवण्याचा प्रयत्न केला,
असा युक्तिवाद चौधरी यांनी न्यायालयासमोर केला होता.

 

Web Title :- Anil Deshmukh | anil deshmukh cbi court issues release order after hc refuses to stay bail

 

हे देखील वाचा :

Phone Tapping Case | मला आजही भीती वाटते कुणाशी कसं…; फोन टॅपिंग प्रकरणावर एकनाथ खडसेंचे सभागृहात विधान

Subhash Desai | सुभाष देसाईंनी एक हजार कोटींचा घोटाळा केला, खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

Pune Crime | मुलुंड येथील बनावट कॉल सेंटरद्वारे महिलेची फसवणूक करण्याऱ्या आरोपीस जामीन मंजूर

 

Related Posts