IMPIMP

Anil Deshmukh | काटोल, नरखेड तालुक्यातील जनतेच्या प्रमुख मागणीचे अनिल देशमुखांकडून मुख्यमंत्र्याना पत्र…

by nagesh
Anil Deshmukh | anil deshmukh writes letter to chief minister eknath shinde to start katol civil court

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन-  महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी कारागृहाबाहेर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी नागपूर येथील काटोल मध्ये एक वरिष्ठ दिवाणी न्यायालय हवं अशी मागणी केली आहे. त्या पत्रातून त्यांनी काटोल येथील जनतेच्या व्यथा मांडल्या आहेत. (Anil Deshmukh)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) काटोल नरखेड तालुक्यातील जनतेच्या सोईसाठी काटोल येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालयाची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काटोल व नरखेड तालुक्यातील जनतेच्या सोईसाठी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरु करण्याची मागणी होती. त्या मागणीला मुंबई उच्चन्यालयाने तत्वत: मंजुरी दिली असून तसा प्रस्ताव राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाला पुढील मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावाला लवकरात लवकर मान्यता देऊन आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आमदार अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.

 

काटोल व नरखेड तालुक्यातील विशेषत: नरखेड तालुक्यातील जनतेला नागपूर येथे न्यायालयीन कामासाठी येणे – जाणे फार त्रासदासक होते. यामुळे काटोल येथेच वरिष्ठस्तर दिवानी न्यायालयाची मागणी होत होती. त्या संदर्भात नरखेड व काटोल तालुका वकिल संघाने सुद्धा मागणी केली होती. याला मंजुरी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी वकील संघटनांसोबत चर्चा करुन यावर कसा तोडगा काढता येईल यासाठी प्रयत्न केले. याला प्राथमिक मान्यता मिळण्यासाठी मुंबई येथील उच्च न्यायालयात प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कमिटीने तत्वत: मान्यता दिली असुन पुढील मंजुरीसाठी तो राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाला पाठविला आहे. (Anil Deshmukh)

 

जर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय काटोल येथे सुरु झाले तर याचा मोठया प्रमाणात फायदा नरखेड व
काटोल तालुक्यातील जनतेला होणार आहे. यामुळे याला तातडीने मंजुरी मिळाल्यास हे न्यायालय लवकरात
लवकर सुरु होईल. यामुळे राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने यासंदर्भात पुढील प्रक्रिया सुरु करुन
राज्य सरकारने याला मंजुरी देण्याची मागणी अनिल देशमुख यांनी आपल्या पत्रात केली आहे.
तसेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या मंजुरीनंतर येथे भौतिक सुविधांसाठी आर्थिक तरतूद सुध्दा आवश्यक आहे.
यामुळे आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतुद सुध्दा करण्याची मागणी अनिल देशमुख यांनी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहलेल्या पत्रातून केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Anil Deshmukh | anil deshmukh writes letter to chief minister eknath shinde to start katol civil court

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | ‘इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी-गुजरात को देंगे’, जयंत पाटलांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Legislative Council Election | विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या 3 उमेदवारांची घोषणा, ‘या’ जागेचा निर्णय गुलदस्त्यात (व्हिडिओ)

Akshay Kelkar | अक्षय केळकरने विजेते पद पटकावल्यानंतर त्याला मिळाली तब्बल एवढी रक्कम; वाचून व्हाल थक्क

 

Related Posts