IMPIMP

Jayant Patil | ‘इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी-गुजरात को देंगे’, जयंत पाटलांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

by nagesh
Jayant Patil | ncp leader jayant patil reaction on chandrashekhar bawankule statement about bjp shinde camp seat sharing formula for 2024 vidhansabha election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन-  राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यातील उद्योग गुजरातला गेल्याने कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक गेली शिवाय हजारो रोजगार गेले. असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राज्यातील गुंतवणूक (Investment in State) गेल्याचे, बॅनर्स, फोटो आणि मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट केलेल्या एका बॅनरच्या फोटोची चर्चा सध्या सुरु आहे. या फोटोच्या माध्यमातून जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एका बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांचा फोटो दिसत आहे. त्यावर इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी, गुजरात को देंगे असं म्हटलं आहे. तर एका बॅनरवर दूध मांगोगे दूध देंगे, तर तिसऱ्या बॅनरवर खीर मांगोगे खीर देंगे, असं लिहिलं आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलेल्या या ट्विटची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा रंगली आहे. हा फोटो ट्विट करत जयंत पाटील यांनी एक हटके कॅप्शन दिले आहे. ‘फोटोतील प्रतिमा व शब्दांचा वास्तवाशी काही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा’ असं कॅप्शन पाटील यांनी दिलं आहे.

 

 

सध्या सोशल मीडियावर ब्लिंक इट (Blink It) आणि झोमॅटोचे (Zomato) होर्डिंग्स चर्चेचा विषय बनले आहे.
अनेकजण वेगवेगळे मीम्स (Memes) शेअर करत आहेत.
जयंत पाटील यांनीही एक मीम शेअर केले आहे.
तेच मीम शेअर करत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका केली आहे.
जयंत पाटील हे सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असतात. बऱ्याच ट्रेंड्सला ते फॉलो करतात.
त्यातच त्यांनी ब्लिंक इट आणि झोमॅटोच्या ट्रेंडचा वापर करुन राज्य सरकारवर टीका केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Jayant Patil | if you demand milk will give milk if you demand investment will give it but only for up gujarat jayant patil lashes out on shinde fadnavis

 

हे देखील वाचा :

Ramdas Athawale | कवाडे गटाच्या समावेशावरून रामदास आठवले नाराज; म्हणाले…

Akshay Kelkar | अक्षय केळकरने विजेते पद पटकावल्यानंतर त्याला मिळाली तब्बल एवढी रक्कम; वाचून व्हाल थक्क

CM Eknath Shinde | …तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरू शकतात ‘या’ ठिकाणी जाणारे पहिलेच मुख्यमंत्री

 

Related Posts