IMPIMP

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार, CBI कस्टडी घेण्याच्या तयारीत

by nagesh
Anil Deshmukh | anil deshmukh writes letter to chief minister eknath shinde to start katol civil court

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी आणखी वाढत चालल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयानंतर (ED) आता केंद्रीय तपास संस्था (CBI) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची कस्टडी घेण्याची तयारी करत आहे. लवकरच सीबीआय याबाबत कोर्टासमोर पत्र सारद करेल. सीबीआयने एप्रिलमध्ये देशमुख यांच्याविरूद्ध भ्रष्टाचाराचे प्रकरण दाखल केले होते आणि मध्यस्थास ठाण्यातून अटक केली होती.

अटक टाळण्यासाठी परमबीर सिंग बेपत्ता

मुंबईचे माजी पोलीस आुयक्त परमबीर सिंग (Mumbai Former CP Parambir Singh) यांच्या तक्रारीच्या आधारावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता,
मात्र आता या प्रकरणात परमबीर सिंग सुद्धा कथित आरोपी असल्याचे सांगितले गेले आहे.
परंतु ज्यांच्या आरोपीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला, ते परमबीर सिंगच सध्या गायब असल्याने त्यांची अटक शक्य नाही.

मध्यस्थी संतोष शंकर जगतापचे (Santosh Shankar Jagtap) नाव ट्रान्सफर पोस्टिंगच्या सीबीआयच्या तपासात समोर आले होते.
स्थानिक कोर्टातून दिड महिन्यापूर्वी त्याच्याविरूद्ध एनबीडब्ल्यू वॉरंट जारी केले होते.
महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.
तपास एजन्सीजने या ट्रान्सफर पोस्टिंग प्रकरणात आयपीएस रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांचाही जबाब नोंदवला होता.

काही दिवसांपूर्वीच ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत करण्यात येत असलेल्या तपासांतर्गत अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक केली होती आणि कस्टडीत घेऊन चौकशी केली होती. नंतर कोर्टाने देशमुख यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.
अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंगच्या या प्रकरणात अनिल देशमुखांच्या मुलाला सुद्धा चौकशीसाठी समन्स जारी केले होते.

 

Web Title : anil deshmukh cbi is preparing to take custody of former home minister anil deshmukh

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Aryan Khan Drugs Case | नवाब मलिकांचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘खंडणीसाठी ‘आर्यन’चं अपहरण, वानखेडेंशी घनिष्ठ मैत्री असणारे भाजपा नेते मोहित कंबोज मास्टर माईंड’ (व्हिडीओ)

तुमच्याही PF Account मध्ये चुकीची असेल जन्मतारीख (DOB) तर तर तात्काळ ‘या’ पध्दतीनं करा दुरूस्त, अन्यथा अडकतील सर्व पैसे

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडव निष्काळजीपणामुळे; गुन्हा दाखल 

Related Posts