IMPIMP

Anil Deshmukh | सर्वोच्च न्यायालयानं अनिल देशमुखांची तपासाबाबत ‘ती’ मागणी करणारी याचिका फेटाळली; माजी गृहमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?

by nagesh
Anil Deshmukh | former maharashtra home minister anil deshmukh s bail application rejected by pmla court mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anil Deshmukh | माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या खंडणीचे आरोप केले. यानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यात वारंवार अडचणी होताना दिसत आहे. सीबीआय (CBI) तपासाचा अहवाल तपासणीसाठी न्यायालयाच्या समोर ठेवण्याची मागणी करणारी देशमुख यांची याचिका सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) फेटाळली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

तर, तपास यंत्रणांना त्यांनी केलेल्या चौकशीची माहिती निरीक्षणासाठी न्यायालयासमोर ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने देशमुख यांनी दाखल केलेली ही याचिका फेटाळून लावली आहे. तसेच परंतु हायकोर्टात (High Court) जाण्याची परवानगी सुप्रिम कोर्टाने देशमुख यांना दिली आहे.

बुधवारी सीबीआयने हाय कोर्टात म्हटले की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराप्रकरणी सुरू असलेल्या तपासाला खीळ बसावी, त्यात तपास यंत्रणेला अपयश यावे, यासाठी राज्य सरकार ‘निर्लज्जपणे’ प्रयत्न करत आहे. त्यामुळे या याचिकेद्वारे दिलासा मिळविण्यास राज्य सरकार पात्र नाही. असं म्हटलं आहे. त्याचबरोबर, देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेल्या तपासाप्रकरणी सीबीआय (CBI) ने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief Secretary Sitaram Kunte) व पोलीस महासंचालक संजय पांड्ये (Sanjay Pandey DGP) यांना बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नितीन जामदार (Justice. Nitin Jamdar) व न्या. सारंग कोतवाल (Justice. Sarang Kotwal) यांच्या खंडपीठापुढे होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Anil Deshmukh | former home minister anil deshmukh another blow anil deshmukh supreme court rejects petition seeking inquiry

हे देखील वाचा :

IND Vs NZ | ‘या’ माजी क्रिकेटपटूनं सांगितली हिटमॅन रोहितच्या कॅप्टनसीमधील चूक

Shirdi Saibaba Sansthan | शिर्डी संस्थानाच्या बाबतचा ‘तो’ निर्णय लांबणीवर; मुख्यमंत्र्यांच्या तब्यतीचे दिले कारण

Priyanka Chopra | प्रियंका चोप्राचा पती निक जोनसला वयाच्या 13 व्या वर्षापासून आहे ‘हा’ आजार

Related Posts