IMPIMP

Anil Deshmukh | …अन् रात्री साडेबाराच्या दरम्यान देशमुखांना अटक करण्याचा निर्णय झाला

by nagesh
Anil Deshmukh Money Laundering Case | ed names anil deshmukh as main accused in the 7000 pages chargesheet filed in the money laundering case

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनमाजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने (ED) सोमवारी रात्री अटक केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे ईडीने तब्बल १३ तास चौकशी केली. मात्र त्यातील अखेरचे चार तास महत्त्वाचे ठरले. दिल्लीवरून आलेले सत्यव्रत कुमार (IRS Officer Satyavrat Kumar) यांनी साडेआठ वाजता चौकशीची सूत्रे ताब्यात घेतली. मात्र, देशमुख यांनी उडवाउडावीची उत्तरे आणि प्रतिसाद देत नसल्याने रात्री साडेबाराच्या दरम्यान, देशमुखांना संशयित म्हणून अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सीबीआयने (CBI) कथित १०० कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल केला आहे. त्या आधारेच ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या १९ PMLA अंतर्गत गुन्हा दाखल केला. उच्च न्यायालयाने शुक्रावरी देशमुख (Anil Deshmukh) यांची याचिका फेटाळली होती. त्यामुळे ते सोमवारी स्वतः ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर दिल्लीतील वरिष्ठ कार्यालयाला याबाबत कळवण्यात आले. मुंबई युनिट-२ चे योगेश वर्मा (Yogesh Verma) यांना देशमुख यांच्या चौकशीची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या तर कामानिमित्त दिल्लीत असलेले मुंबई विभागाचे सत्यव्रत कुमार यांनाही तत्काळ मुंबईला जाण्याच्या सूचना करण्यात आल्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सत्यव्रत कुमार यांच्याकडे पणजी आणि रायपूरचा अतिरिक्त पदभार असल्याने ते कामानिमित्त दिल्लीत होते. मुख्यालयातील विशेष संचालक अनुपकुमार दुबे (ed director anup kumar dubey) यांच्या सूचना मिळताच सत्यव्रत कुमार हे तत्काळ मुंबईसाठी रवाना झाले. रात्री साडेआठ वाजता ते मुंबईत आले आणि देशमुख (Anil Deshmukh) यांची पुन्हा चौकशी सुरू झाली. वर्मा यांच्या चौकशीतून काहीच समोर आले नव्हते त्यामुळे यापुढील चौकशी महत्त्वाची ठरली. सत्यव्रत कुमार यांनी चौकशी सुरू केली. काही प्रश्न विचारण्यात आले पण देशमुख यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यामुळे सत्यव्रत कुमार यांनी सहकार्यांना रात्री उशिरापर्यंत थांबण्याच्या सूचना केल्या.
अटक केलेल्या पी. ए. कुंदन शिंदे, संजीव पलांडे यांच्याकडून मिळालेली माहिती,
सचिन वाझे व अन्य साक्षीदाराच्या जबाबाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे माहिती विचारली.
पण देशमुखांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे रात्री साडेबाराच्या सुमारास संशयित म्हणून देशमुख यांना अटक करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह कार्यालयात आले. देशमुख यांच्याशी त्यांनी चर्चा केली. सुमारे तीनच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले.
इंद्रपाल सिंह म्हणाले, देशमुख यांच्यावर सेक्शन १९ पीएमएलए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून ती चुकीची आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

अनिल देशमुख यांची दिवाळी कोठडीत जाणार आहे. त्यांचे वय आणि आजारपण लक्षात घेऊन न्यायालयाने काही मुभा दिल्याचे वकील इंद्रपाल सिंह यांनी सांगितले.
यामध्ये देशमुख यांना घरचे जेवण, औषधे मिळणार आहेत. तसेच चौकशीवेळी त्यांच्या वकिलालाही त्यांच्यासमवेत उपस्थित राहता येणार आहे.

 

Web Title :- Anil Deshmukh | Former home minister anil deshmukh arrested last four hours were decisive enforcement directorate

 

हे देखील वाचा :

Police Recruitment | पोलीस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी! डिसेंबर नंतर होणार 13000 साठी भरती, जाणून घ्या सविस्तर

Sameer Wankhede Property | समीर वानखेडेंची ‘इतकी’ आहे संपत्ती ! जाणून घ्या कुठं किती एकर जमीन अन् किती फ्लॅट

High Court | अलाहाबाद HC ची महत्वाची टिप्पणी, म्हणाले – ‘डेटिंग साईटवर सक्रिय आहे म्हणून तिच्या चारित्र्याचे मूल्यांकन केले जाऊ शकत नाही’

 

Related Posts