IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Dhule | 45 हजारांची लाच घेताना कनिष्ठ लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

धुळे : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau ACB Dhule | जात प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळवून देण्यासाठी 45 हजार रुपयांची लाच स्वीकारणारा कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Dhule) जाळ्यात सापडला आहे. 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 45 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा जात पडताळणी समितीतील कनिष्ठ लिपिक विजय रतन वाघ (Vijay Ratan Wagh) याला एसीबी पथकाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

धुळे शहरातील (Dhule News) रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने 2017 साली जात प्रमाणपत्र घेतले आहे.
आता जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) मिळवण्यासाठी त्यांनी संबंधित विभागात अर्ज दिला होता.
यासोबतच मूळ जात प्रमाणपत्रही दिले होते, पण, हे जात प्रमाणपत्र हरवल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे तक्रारदाराने जात प्रमाणपत्रांची दुय्यम प्रत द्यावी अशी मागणी केली. त्याच्या मोबदल्यात कनिष्ठ लिपिक विजय वाघ यांनी 50 हजारांची मागणी केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

 

दरम्यान, या तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सापळा रचला गेला.
त्यानंतर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळील रस्त्यावर तडजोडीअंती 45 हजारांची लाच घेताना विजय वाघ (Vijay Wagh)
यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Dhule | Junio clerk Vijay Ratan Wagh caught taking bribe of rs 45000 in dhule acb action

 

हे देखील वाचा :

Pune Corona Update | दिलासादायक! पुणे शहरात आज 1165 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Sanjay Raut | किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर संजय राऊतांनी विचारले ‘हे’ 6 प्रश्न

Sukanya Samriddhi yojana (SSY) | मोदी सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत 5 मोठे बदल; जाणून घ्या

EPFO | EPF खात्यातुन पैसे काढणे म्हणजे 15 लाख 33 हजाराचे नुकसान?; जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts