IMPIMP

EPFO | EPF खात्यातुन पैसे काढणे म्हणजे 15 लाख 33 हजाराचे नुकसान?; जाणून घ्या सविस्तर

by nagesh
EPFO Update | epfo member employees may get rupees 81000 before august 30 know how to check pf balance

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन EPFO | कोरोना विषाणूच्या (Corona) महामारीत अनेक लोकांचा व्यवसाय ठप्प झाला तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा परिस्थित खायचे काय? हा मुळात प्रश्न भेडसावत होता. त्यामुळे होते नव्हते जमा केलेले पैसे तेही लोकांनी काढून आपल्या पोटाची खळगी भरली. दरम्यान अशा काळामध्ये नोकरदार वर्गाला भविष्य निर्वाह निधीने (PF) मोठा दिलासा दिला. यामुळे आपल्या हक्काचे पैसे नोकरदारांना अडचणीच्या वेळी मिळाले. कोरोनाच्या काळात नागरीकांनी अधिकाधिक निधी काढला. 2021 साली 71 लाखांहून जादा लोकांनी त्यांचे EPF खाते बंद केले. असं EPFO ने सांगितलं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

EPF हा सेवानिवृत्ती बचत निधी आहे, त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की, वेळेपूर्वी त्यातून पैसे काढल्याने तुमचे लाखोंचे नुकसान होऊ शकते. पण, अनेकांना या गोष्टीबाबत जाणीव नसते त्याचबरोबर अपूऱ्या माहितीमुळे आपण अनेकांचे नुकसान करतो. सदस्यांना सहसा असे वाटत नाही. मात्र, एकवेळ पैसे काढल्याने तुमच्या निधीचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. याबाबत जाणून घ्या. (EPFO)

 

समजा तुमच्या निवृत्तीला 30 वर्षे शिल्लक आहेत आणि तुम्ही EPF खात्यातून 1 लाख रुपये काढले आहेत, तर यामुळे तुमचा सेवानिवृत्ती निधी 11.55 लाख रुपयांनी कमी होईल. अशी माहिती ईपीएफओचे निवृत्त सहायक आयुक्त ए.के. शुक्ला (A.K. Shukla) यांनी दिली.

 

जेव्हा तुम्ही वयाच्या 57 व्या वर्षी निवृत्त व्हाल, तेव्हा हे पैसे तुम्हाला कामी येतील. तुमच्यासोबत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसेल तर तुम्ही भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढू नयेत. सध्या PF वर 8.5 टक्के व्याज मिळत आहे. अशी माहिती EPFO च्या नियमांनुसार समोर आलीय. तसेच, सर्व लहान बचत योजनांमध्ये हे सर्वाधिक व्याज आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात जितके अधिक पैसे असतील तितके जास्त व्याज तुम्हाला मिळेल. जर EPF खात्यातून पैसे काढले जात असतील, तर निवृत्ती निधीवरही तसाच परिणाम होऊ शकतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

PF मध्ये योगदान किती आहे?
प्रतिमहिना कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनातून 12 टक्के पगार आणि महागाई भत्ता (मूलभूत पगार + DA) PF खात्यात जमा केला जातो.
नियोक्त्याच्या बाजूनेही योगदान आहे. PF खात्यात 2 प्रकारचे फायदे आहेत. असं EPFO ने सांगितले.
दरम्यान, EPF चा पहिला भाग आणि पेन्शनचा दुसरा भाग (EPS). नियोक्त्याच्या योगदानापैकी 8.33 टक्के रक्कम पेन्शनमध्ये जमा केली जातेय.
तसेच 3.67 टक्के PF मध्ये जमा आहे. संपूर्ण पैशावर चक्रवाढीच्या आधारे व्याज मिळते, अर्थात प्रतिवर्षी व्याजावरही व्याज मिळतो.
त्यामुळे तुम्हाला अती महत्वाचे असल्याव्यतिरिक्त कधीही यामधून पैसे काढू नका.

 

#EPFO     #Corona     #PF      #DA

 

Web Title :- EPFO | withdrawal money from epf account then you will loss 15 lakh 33 thousand rupees check the calculation and profit loss

 

हे देखील वाचा :

LIC Unclaimed Money | एलआयसीकडे बेवारस पडून आहेत 20,000 कोटी रुपये, कोणीही नाही दावेदार; इतक्या पैशात तर टाटा ग्रुपच्या ‘या’ पाच कंपन्या उभ्या राहिल्या असत्या

Kevin Pietersen PAN Card | काय सांगता ! पॅन कार्ड हरवल्यावर ‘या’ विदेशी खेळाडूने मागितली थेट PM मोदींकडे मदत

Multibagger Penny Stocks | ‘या’ पेनी स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले लखपती, एका वर्षात दिला 1900 टक्के रिटर्न

 

Related Posts