IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 15 हजार रुपयाची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक आणि खाजगी इसम अँटी करप्शनच्या जाळ्यात, 2 दिवसांची पोलीस कोठडी

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनतक्रार अर्जावरुन गुन्हा (FIR) दाखल न करण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी (Demand Of Bribe) करुन 15 हजार रुपये लाच स्विकारताना बारामती तालुका पोलीस ठाण्यातील (Baramati Taluka Police Station) पोलीस उपनिरीक्षक विलास दत्तात्रय धोत्रे PSI Vilas Dattatraya Dhotre (वय – 35) आणि खासगी व्यक्ती ऋषिकेश नंदकुमार पतंगे Rishikesh Nandkumar Patange (वय – 24) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) सापळा रचून अटक (Arrest) केली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) केलेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत 25 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या विरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज (Complaint Application) दाखल केला असून तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे याने 50 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केली.

 

तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची शनिवारी (दि.9) पडताळणी केली असता तक्रारदार यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी खासगी इसम ऋषिकेश पतंगे याने पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे यांच्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीमध्ये 15 हजार रुपये लाच मागून ती स्वीकारली. स्वीकारलेली लाचेची रक्कम धोत्रे यांच्याकडे देताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. दोघांना विशेष न्यायालय बारामती (Special Court Baramati) येथे हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर (Police Inspector Praneta Sangolkar) करीत आहेत.

 

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Sub Inspector of Police and private person caught in bribery of Rs 15000 2 days police custody

 

हे देखील वाचा :

Katrina Kaif Airport Look | गुलाबी रंगाच्या सलवार सूटमध्ये कतरिनानं दाखवला देशी अंदाज, विमानतळावर बघताच नेटकरी झाले तिच्यावर फिदा

Multibagger Stocks | ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांची झाली चांदी; 2 वर्षात एक लाख बनले 18.25 लाख, जाणून घ्या

Maharashtra Phone Tapping Case | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचा फोन टॅपिंग प्रकरणात मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut | ‘सोमय्यांची माणसं राजभवनात बॅकडेटेड कागदपत्रं बनवत असून ते देशाबाहेर पळून जाणार’; राऊतांचा गंंभीर आरोप

 

Related Posts