IMPIMP

Army Jawans Killed In Road Accident | सिक्कीमध्ये लष्कराची बस दरीत कोसळली; 16 भारतीय जवानांचा मृत्यू

by nagesh
Army Jawans Killed In Road Accident | 16 indian jawans die in major truck accident army truck was literally crushed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Army Jawans Killed In Road Accident | सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. लष्कराचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात 16 भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हे लष्कराचे वाहन चट्टेहून थंगूच्या दिशेने जात होते. झेमा येथे वळण घेत असताना तीव्र उतारावरुन ट्रक घसरला. यानंतर हा अपघात झाला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) म्हणाले, एन.सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या (Army Jawans Killed In Road Accident) जीवितहानीमुळे खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबियांना माझ्या संवेदना, जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना ही त्यांनी केली.

 

 

हा ट्रक तीन वाहनांच्या ताफ्यातील होता. तो सकाळी चट्टेनहून थंगूच्या दिशेने निघाला होता.
झेमा येथे जाताना, वळण घेत असताना वाहन तीव्र उतारावरुन घसरला आणि हा अपघात झाला.
बचाव मोहीम तात्काळ सुरु करण्यात आली. चार जखमी सैनिकांना बाहेर काढण्यात आले.
दुर्दैवाने, तीन कनिष्ठ आयुक्त अधिकारी आणि 13 सैनिक या अपघातात जखमी होऊन मरण पावले.
या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे. असे सैन्यदलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Army Jawans Killed In Road Accident | 16 indian jawans die in major truck accident army truck was literally crushed

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बँकेत खोटे सोने गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्या आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर

Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीची ‘ती’ प्रतिक्रिया चर्चेत ; पाकिस्तानी चाहता झाला खूश

Ravi Rana | उमेश कोल्हे हत्या प्रकरणात रवी राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, शंभूराज देसाईंनी दिले चौकशीचे आदेश

 

Related Posts