IMPIMP

Arvind Sawant | ‘…तोपर्यंत भाजपचा कोणताही नेता महाराष्ट्रात फिरू शकणार नाही’ – अरविंद सावंत

by nagesh
Arvind Sawant | arvind sawant warn bjp leaders over remark of mangal prabhat lodha on chhatrapati shivaji maharaj

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – बुधवारी (दि. 30) प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळा संपन्न झाला. यावेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नव्या वादाला सुरुवात केली. लोढा यांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाशी केली. त्यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. गुरुवारी मुंबईत शिवसेना खासदार अरविंद सावंत ( Arvind Sawant) यांच्या नेतृत्वाखाली मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी अरविंद सावंत ( Arvind Sawant) म्हणाले, जोपर्यंत भाजपचे नेते छत्रपतींच्या अपमानाबद्दल पश्चाताप व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत उभ्या महाराष्ट्रात भाजपचा कुठलाही नेता फिरू शकणार नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी अरविंद सावंत यांनी लोढा यांना इयत्ता चौथीच्या इतिहासाचे पुस्तक दिले आणि वाचण्यास सांगितले. लोढा यांना महाराष्ट्राचा अपमान करायचा आहे. त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे. मंगलप्रभात लोढा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही शात बसणार नाही. आम्ही लोढांना चौथीच्या इतिहासाचे पुस्तक भेट देत आहोत. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लिहिलेला आहे. ज्यांना इतिहास माहिती नाही, त्यांना आम्ही इतिहास शिकवीत आहोत. तसेच जोपर्यंत भाजपच्या लोकांना आणि नेत्यांना त्यांनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या अपमानाचा पश्चाताप होत नाही, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्रात उघडपणे फिरू देणार नाही, असे यावेळी अरविंद सावंत ( Arvind Sawant) म्हणाले.

 

ज्यावेळी हे लोक विधाने करतात, त्यांचा लोकांकडून संताप व्यक्त केला जातो. मग यांचे नेते म्हणतात, आमच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला जातो. ते अनर्थ निर्माण करत आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीची तुलना शिवाजी महाराजांच्या साहसी आग्रा सुटकेशी केली आहे. शिवाजी महाराज औरंगजेब बादशहाच्या दरबारातून आले. एकनाथ शिंदे दिल्लीच्या दरबारात होते का? त्यांनी तर आमच्याच पाठीत खंजीर खुपसला आहे.

 

भाजप देशात विभाजनवादी विचार प्रसारित करत आहे. हे देशाचे मोठे दुर्दैव आहे.
भाजप संविधानाच्या विरोधात पावले टाकत आहे. देशाचे विधिमंत्री रिजुजू देशाच्या न्यायव्यवस्थेवरच टीका करतात.
हे सर्व संविधानाच्या विरोधात आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापि सहन करणार नाही.
आम्ही संतप्त आहोत. जोपर्यंत भाजपाचे लोक माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही,
असा इशारा यावेळी सावंतांनी दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Arvind Sawant | arvind sawant warn bjp leaders over remark of mangal prabhat lodha on chhatrapati shivaji maharaj

 

हे देखील वाचा :

Abhijeet Sawant | मराठी संस्कृतीबद्दल अभिजीत सावंतचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाला…..

Pune Pimpri Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! बालविवाहप्रकरणी पतीवर FIR; अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस

Sharad Kelkar | शरद केळकरने आदिपुरुषमधील प्रभासच्या व्यक्तिरेखेला आपला आवाज देण्याबाबत केला खुलासा

 

Related Posts