IMPIMP

Abhijeet Sawant | मराठी संस्कृतीबद्दल अभिजीत सावंतचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाला…..

by nagesh
Abhijeet Sawant | abhijeet sawant share about marathi culture people and fame on screen

सरकारसत्ता ऑनलाईन  : Abhijeet Sawant | लोकप्रिय रियालिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल’. या इंडियन आयडलचे पहिले पर्व जिंकणारा गायक अभिजीत सावंत आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. यानंतर अभिजीतच्या मोहब्बते लुटाऊंगा या गाण्याने तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. या गाण्यानंतर तो जास्तीच प्रसिद्धी झोतात आला होता. नुकताच त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मराठी संस्कृतीबद्दलही भाष्य केले होते. (Abhijeet Sawant)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

इंडियन आयडल जिंकल्यानंतर अभिजीतला गाण्याच्या अनेक ऑफर्स आल्या होत्या. यामुळे अभिजीतला प्रसिद्धी मिळाली होती, तर नुकताच अभिजीतला मराठी संस्कृती करिअर याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी त्यांनी त्याचा फायदा आणि तोटा काय झाला याचा खुलासा केला. (Abhijeet Sawant)

 

 

अभिजीत सावंतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. अभिजित म्हणाला, “संगीत क्षेत्रात करिअर करायची माझी इच्छा होती. मात्र, संगीत क्षेत्रातील कोणीच नसल्यामुळे मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला, तर कधी गणपती, नवरात्री यात मी गाणीदेखील गायली आहेत. छोटे छोटे शो करून मी पैसे कमवायचो. मात्र, मला एवढी प्रसिद्धी मिळेल मी एवढ्या उंचीवर जाईन असे मला कधीच वाटले नव्हते. पण मी मराठी असल्याचा मला खूपच फायदा झाला. मराठी संस्कृतीचा मला फायदा झाला. कारण मराठी कलाकारांना कधीच जास्त प्रसिद्ध दिली जात नाही. त्यांना जास्त उडू दिलं जात नाही”. असेही तो म्हणाला.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Abhijeet Sawant | abhijeet sawant share about marathi culture people and fame on screen

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! बालविवाहप्रकरणी पतीवर FIR; अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस

Sharad Kelkar | शरद केळकरने आदिपुरुषमधील प्रभासच्या व्यक्तिरेखेला आपला आवाज देण्याबाबत केला खुलासा

Vijay Deverakonda | विजय देवरकोंडाची ईडीच्या चौकशीला हजेरी; ‘या’ चित्रपटाच्या व्यवहाराची चौकशी

Satara ACB Trap | दोन लाखांच्या लाचप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोन जण अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts