IMPIMP

Assembly Elections 2022-2023 | सन 2022-23 मध्ये तब्बल 11 राज्यांमध्ये निवडणुका, जाणून घ्या इलेक्शन जिंकण्यासाठीचे मोदींचे मिशन

by nagesh
Assembly Elections 2022-2023 | elections in 11 states in 2022 23 modis mission to win elections

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Assembly Elections 2022-2023 | सध्या देशात गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तसेच येत्या 2023 साली सुद्धा देशात अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे भाजपसह अन्य पक्ष देखील तयारीला लागले आहेत. भाजपला ज्या राज्यांत त्यांची सत्ता आहे, तिथे सत्ता आबाधित ठेवण्याचे लक्ष्य आहे, तर सत्ता नसलेल्या राज्यांत सत्ता काबीज करायची आहे. त्यामुळे आगामी वर्षात जनतेला निवडणुकांची रणधुमाळी पाहता येणार आहे. (Assembly Elections 2022-2023)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाजप या सर्व निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढविणार आहे. या अनुषंगाने पक्षाच्या कोअर कमिटीची एक बैठक देखील दिल्लीत पार पडली. तसेच निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये पक्षाने सर्वेक्षण देखील केले आहे. त्यामुळे या निवडणुका भाजप आणि सर्वच पक्षांसाठी महत्वाच्या असणार आहेत. (Assembly Elections 2022-2023)

 

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर मे 2023 मध्ये कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या पाच राज्यांत निवडणुका होणार आहेत.
तसेच मे 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीसोबत आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिसा आणि सिक्किममध्ये निवडणुका होणार आहेत.
एकीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देखील सुरू आहे.
तर दुसरीकडे भाजपने वरील सर्व राज्यांत निवडणुकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे.
त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात विधानसभा निवडणुका होणार असल्याने काँग्रेस आणि भाजप तयारीला लागले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Assembly Elections 2022-2023 | elections in 11 states in 2022 23 modis mission to win elections

 

हे देखील वाचा :

Sandeep Khardekar | सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव ही पुणे मनपातील भाजपाच्या भावी यशाची नांदी – संदीप खर्डेकर

Pune News | विकासाच्या अनुषंगाने वक्फ मालमत्तांच्या सुयोग्य वापराविषयी मुस्लिम समुदाय करणार विचारमंथन

PSI Death-Heart Attack | मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू

 

Related Posts