IMPIMP

Baba Ram Rahim | पॅरोलवर बाहेर आलेल्या बाबा राम रहिमचे नवे गाणे लाँच

by nagesh
Baba Ram Rahim | how people should stay away from alcohol and gambling new song by baba ram rahim who came out on parole

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर एखादा माणूस गंभीर गुन्ह्यासाठी (Crime) आतमध्ये गेला असेल तर तो लवकर बाहेर येत नाही. त्याला आजन्म तुरुंगात
खितपत पडावं लागतं. हे गृहीतक बाबा राम रहिमला (Baba Ram Rahim) लागू होत नाही. बाबा राम रहिमवरील बलात्काराचा (Rape) गुन्हा सिद्ध
झाला आहे. तरीदेखील बाबा राम रहिमला तुरुंगातून 40 दिवसांची पॅरोल सुट्टी (Parole leave) मिळाली आहे. सध्या राम रहिमचे (Baba Ram Rahim)
नवीन गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. राम रहिमने दारु आणि जुगारापासून लोकांनी लांब राहावं, यासाठी हे नवीन गाणे तयार केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बाबा राम रहिमची त्याची कथित शिष्या हनीप्रीतचे नामकरण केलंय हनीप्रीतचं नाव बदलून तिचे नाव रुहानी दीदी असं ठेवण्यात आलंय. विशेष म्हणजे हनीप्रीतचं मूळ नाव प्रियंका तनेजा (Priyanka Taneja) आहे. 1999 मध्ये राम रहिमनंच प्रियंका नाव बदलून हनीप्रीत ठेवलं होतं. आता पुन्हा हनीप्रीतऐवजी रुहानी दीदी असे नामकरण करण्यात आले आहे. पॅरोलच्या सुट्टीवर बाहेर आल्यानंतर राम रहिमनं हरियाणाच्या बागपथमध्ये एका कथा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
त्याच्या या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेतेदेखील उपस्थित होते.

 

राम रहिमवर (Baba Ram Rahim) हत्या आणि बलात्तकाराचा गुन्हा सिद्ध झाला आहे.
त्यासाठी त्याला 20 वर्षांची कैद सुनावण्यात आली आहे.
योगायोगानं जेव्हा-जेव्हा निवडणुका तोंडावर असतात त्याचेवेळी राम रहिमला सुट्टी मंजूर होते.
सध्या हरियाणात नगर पंचायतींच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत.
फेब्रुवारीत जेव्हा पंजाबच्या निवडणुका झाल्या, तेव्हा सुद्धा राम रहिम सुट्टी घेऊन तुरुंगाबाहेर आला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Baba Ram Rahim | how people should stay away from alcohol and gambling new song by baba ram rahim who came out on parole

 

हे देखील वाचा :

Medical Education in Marathi | हिंदीपाठोपाठ आता वैदकीय शिक्षण मराठीतून

Gujarat Election 2022 | निवडणूक आयोगाचा निर्णय ! गुजरातमध्ये विधानसभेपूर्वी 900 अधिकार्‍यांच्या बदल्या, जाणून घ्या कारण

Tata Airbus Project | काँग्रेसचा घणाघाती आरोप, शिंदे फडणवीस सरकार गुजरातचे एजंट! प्रकल्पांपाठोपाठ मुंबई सुद्धा त्यांना देऊन टाकतील

 

Related Posts