IMPIMP

Bank Holidays In June 2022 | 11 ते 26 जून दरम्यान 6 दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

by nagesh
Bank Holidays | bank holidays in august 2022 sbi holiday list janmashtami holiday rbi holiday calendar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Bank Holidays in June 2022 | बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्यात तुमचं बँकेत काही काम असेल तर लवकर उरकून घ्या अन्यथा कामाचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण 11 जूनपासून बँकांच्या सुट्ट्या (Bank Holidays in June 2022) सुरू होत आहेत. 26 जूनपर्यंत बँकांना 6 सुट्ट्या असून 27 जून रोजी बँक कर्मचाऱ्यांचा संप असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला बँकेतील कामे करता येणार नाहीत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

देशातील विविध ठिकाणी सुट्ट्या वेगवेगळ्या दिवसांसाठी असणार आहेत. दरम्यान, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC), ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) आणि नॅशनल असोसिएशन ऑफ बँक एम्प्लॉइजसह 9 बँक युनियन्सची संघटना आहे, यांनी हा संप पुकारला आहे. पेन्शनशी संबंधित समस्या आणि 5 दिवसांच्या कामाच्या मागणीसाठी 27 जून रोजी हा संप आहे. ( Bank Holidays in June 2022)

 

दरम्यान, राष्ट्रीय पेन्शन योजनेत सुधारणा करून ती काढून टाकण्याची आणि सर्व बँक कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करण्याची मागणी आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, या संपात सात लाख कामगार सहभागी होणार असून, त्यामुळे कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याचं एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम (CH Venkatachalam) यांनी सांगितलं.

 

सुट्ट्यांची यादी –

11 जून – दुसरा शनिवार

12 जून – रविवार

15 जून – वायएमए दिन, गुरु हरगोविंद यांचा जन्मदिन आणि राजा संक्रांती (आयझॉल, भुवनेश्वर, जम्मू आणि श्रीनगर बँका बंद)

19 जून – रविवार

25 जून – चौथा शनिवार

26 जून – रविवार

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Bank Holidays In June 2022 | banks will be closed for six days from june 11 to 26 get important work done as soon as possible

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | सोमय्यांचा मुख्यमंत्री ठाकरे आणि राऊतांवर निशाणा; म्हणाले – ‘..तोपर्यंत मला कोणतंही पद नको’

Pune Crime | मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या महिलेचा कालव्यात बुडून मृत्यू

Pune Pimpri Crime | देहूगाव परिसरातील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 22 वर्षीय तरुणीची सुटका

 

Related Posts