IMPIMP

Kirit Somaiya | सोमय्यांचा मुख्यमंत्री ठाकरे आणि राऊतांवर निशाणा; म्हणाले – ‘..तोपर्यंत मला कोणतंही पद नको’

by nagesh
Kirit Somaiya | kirit somaiya made a suggestive statement mentioning anil parab hasan mushrif and sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kirit Somaiya | अनेक कारणावरून राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि भाजप (BJP) यांच्यात राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळतं आहे. अशातच आता भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, “राज्यातील माफिया सरकारला गुंडांसारखे राज्य करायचं असून, ठाकरेंनी दाऊदच्या एजंटला मंत्रिमंडळात ठेवलं होतं. परंतु, राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या रक्षण करण्याची जबाबदारी सध्या माझ्याकडे आहे. त्यामुळे ती पूर्ण होईपर्यंत मला दुसरी कोणतीही जबाबदारी नको,” असं विधान सोमय्यांनी केलं आहे.

 

दरम्यान, पुढे बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, “महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनता माफिया सरकारला धडा शिकवणार असून,
आज न्यायालयाने संजय राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या समन्स मुळे राऊतांना देखील कोर्टाने जोरदार थप्पड लगावली असल्याचं,” ते म्हणाले.

 

Web Title :- Kirit Somaiya | BJP leader kirit somaiya on cm uddhav thackeray and sanjay raut court summons

 

हे देखील वाचा :

Rajya Sabha Elections 2022 | भाजपच्या 2 आमदारांना ‘एअरलिफ्ट’ करणार; मतदानासाठी थेट हवाई रुग्णवाहिकेने येणार

Pune Pimpri Crime | देहूगाव परिसरातील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 22 वर्षीय तरुणीची सुटका

Pune University Exams | पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

Related Posts