IMPIMP

रोहित, विराट, द्रविडसोबत चर्चा करून भविष्याचा निर्णय घेऊ; BCCI ने भूमिका केली स्पष्ट

by nagesh
BCCI | t20 world cup bcci to seek rahul dravid rohit sharma and virat kohlis views before deciding future plan

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – BCCI | T- 20 विश्वचषकामध्ये (T-20 World Cup) गुरुवारी उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. या स्पर्धेनंतर भारताच्या T- 20 संघात मोठे बदल करण्याची, काही वरिष्ठ खेळाडूंना संघाबाहेर करण्याची मागणी केली जात आहे. या बाबतीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याशी चर्चा केल्यानंतरच भविष्याच्या दृष्टीने पावले उचलणार असल्याची भूमिका BCCI कडून घेण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘‘रोहित, कोहली आणि द्रविड ऑस्ट्रेलियाहून मायदेशी परतल्यानंतर आमच्यात बैठक होईल. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच T-20 संघाच्या भविष्याची दिशा ठरवली जाईल. आम्ही निर्णय घेण्यासाठी घाई करणार नाही. संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंनी त्यांचे विचार मांडल्यावरच ‘बीसीसीआय’ पुढील निर्णय घेईल,’’ असे BCCI च्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

 

T -20 विश्वचषकाच्या भारतीय संघात रोहित (वय 35 वर्षे) व कोहली (33 वर्षे) यांच्यासह दिनेश कार्तिक (37 वर्षे),
रविचंद्रन अश्विन (36 वर्षे), सूर्यकुमार यादव (32 वर्षे) आणि भुवनेश्वर कुमार (32 वर्षे) या तिशीतील खेळाडूंचा समावेश होता.
पुढील T-20 विश्वचषक स्पर्धा 2024 (T-20 World Cup 2024) साली होणार असून यापैकी काही खेळाडू तोपर्यंत क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारू शकतील.
त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने संघबांधणी करण्याचे आव्हान संघ व्यवस्थापन आणि निवड समितीपुढे असणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- BCCI | t20 world cup bcci to seek rahul dravid rohit sharma and virat kohlis views before deciding future plan

 

हे देखील वाचा :

Chandarashekhar Bawankule-Uddhav Thackeray | चंद्रशेखर बावनकुळेंनी धरलं उध्दव ठाकरेंनाच जबाबदार, म्हणाले – ‘प्रकल्प त्यांच्यामुळेच…’

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर; जाणून घ्या कोर्टात काय-काय झालं

Pune Pimpri Crime | पनवेल महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाला लाखोंचा गंडा, 3 जणांना अटक

 

Related Posts