IMPIMP

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर; जाणून घ्या कोर्टात काय-काय झालं

by nagesh
Jitendra Awhad | ncp jitendra awhad gets bail thane court in molestation by bjp rida rashid

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन   – हर हर महादेव चित्रपटाचा (Har Har Mahadev) शो बंद पाडत असताना मनसेच्या (MNS) कार्यकर्त्याला मारहाण (Beating) केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांना काल अटक केली होती. जितेंद्र आव्हाड यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली. पण, आता जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाने आव्हाड यांच्या वकिलांचा अर्ज मान्य केला आहे. आव्हाड यांच्यासह 12 जणांना कोर्टाने जामीन (Bail Granted) दिला आहे. प्रत्येकी व्यक्तिगत 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) पोलीस तपासासाठी सहकार्य़ करत नसल्याचा दावा केला. तसेच आव्हाडांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. सुनावणी घेताना न्यायाधीश बी.एस. पाल (Judge B.S. Pal) यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर आव्हाड यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे आव्हाड यांचा जामिनासाठी मार्ग मोकळा झाला होता. न्यायाधीश बी.एस. पाल यांनी अटी शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीस जाणे, साक्षीदारांशी संपर्क करु नये, तपासात बाधा आणू नये अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

 

काय आहे प्रकरण?

माजी खासदार संभाजी छत्रपती (Former MP Sambhaji Chhatrapati) यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडला सात’ या मराठी चित्रपटांना विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील आक्रमक झाले. या चित्रटांमध्ये शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची मोडतोड केल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच कारणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यातील एका मॉलमधील ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात (Vartaknagar Police Station) वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

‘हर हर महादेव’ हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील (Chhatrapati Shivaji Maharaj)
आधारित चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शीत झाला आहे. मात्र या चित्रपटाला आता विरोध केला जात आहे.
ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये (Viviana Mall) जाऊन आंदोलन करुन शो बंद पाडला.
यावेळी एका प्रेक्षकाने तिकिटाचे पैसे परत द्या आम्ही आमचा वेळ वाया घालवला आहे का, अशा शब्दात मॉल चालकाला सुनावले.
यावेळी प्रेक्षकाची समजूत काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.
मात्र, संतप्त झालेल्या प्रेक्षकाने त्यांचे ऐकले नाही. अखेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या प्रेक्षकाला मारहाण (Beating) केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- NCP MLA Jitendra Awhad | thane court granted bail to 12 people including jitendra awhad at thane

 

हे देखील वाचा :

President Draupadi Murmu | पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचे राष्ट्रपती विरोधात वादग्रस्त विधान; म्हणाले – ‘आपल्या राष्ट्रपती कशा दिसतात?’

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांना मोठा झटका, विवियाना मॉल मारहाण प्रकरणी न्यायालयीन कोठडी

 

 

Related Posts