IMPIMP

Beed Accident | दुर्देवी ! महिला पोलीस कर्मचाऱ्यासह 9 वर्षाच्या मुलाचा अपघातात मृत्यू

by nagesh
Beed Accident | teerible car accident lady police and 9 year old kid died beed accident news

बीड :  सरकारसत्ता ऑनलाइन Beed Accident | दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात महिला पोलीस
कर्मचाऱ्यासह (Lady Police) त्यांच्या 9 वर्षाच्या मुलाचा (Year Old Kid) दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की गाड्या रस्ता सोडून
शेतात एकमेकांवर आदळल्या. हा अपघात बीडच्या (Beed Accident) परळी रोडवर आज (मंगळवार) सकाळी 10.30 च्या सुमारास झाला. कोमल
शिंदे (Komal Shinde) आणि यश शिंदे (Yash Shinde) असे अपघातात मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहे. कोमल शिंदे या दिंद्रुड पोलीस
ठाण्यात (Dindrud Police Station) कार्यरत होत्या. (Beed Police)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, दिंद्रूड येथील पोलीस कर्मचारी कोमल शिंदे या आजारी मुलाला उपचारासाठी परळी येथे कारमधून (एमएच 14 जिवाय 9113) घेऊन जात होत्या. कार पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे (Navnath Laptate) चालवत होता. दरम्यान परळीच्या दिशेने दुसरी कार (एमएच 47 5326) समोरून येत होती. दोन्ही कारची सिरसाळा जवळ समोरासमोर धडक (Beed Accident) झाली. यात पोलीस कर्मचारी शिंदे आणि त्यांचा मुलगा यश याचा जागीच मृत्यू झाला.

 

तर चालक लटपटे आणि दुसऱ्या कारमधील एकजण गंभीर जखमी झाले आहेत.
दुसऱ्या कारमधील व्यक्ती वैद्यकीय अधिकारी डॉ. इलियास (Medical Officer Dr. Elias) असल्याची माहिती समोर येत आहे.
जखमींना तात्काळ पोलीस आणि नागरिकांनी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात (Ambajogai Government Hospital) उपचारासाठी रवाना केले आहे.
या अपघाताची पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

 

Web Title :- Beed Accident | teerible car accident lady police and 9 year old kid died beed accident news

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | पळून जाणाच्या प्रयत्नात असलेल्या तडीपार गुन्हेगाराला भोसरी पोलिसांकडून अटक

Pune Pimpri Crime | लग्नाला नकार दिल्याच्या रागातून तरुणीची बदनामी, तरुणावर FIR

 

 

Related Posts