IMPIMP

Benefits Of Cycling | सायकलिंगचे फायदे ! मधुमेह अणि हृदयविकाराचा धोका होईल कमी

by nagesh
Benefits Of Cycling | health benefits of cycling daily how good is cycling for your heart and weight management

सरकारसत्ता ऑनलाइन – शरीर निरोगी (Healthy) आणि तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी नियमित व्यायामाची (Exercise) गरज असते. वर्क फ्रॉम होम व कार्यालयातील बैठी जीवनशैलीमुळे आजचे जीवन वेगवान झाले. त्यामुळे व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. अशा वेळी एक चांगला मार्ग म्हणजे नियमित सायकलिंग (Cycling). सायकल चालवणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर (Benefits Of Cycling) मानले जाते. पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यापासून ते वाहतूक सुलभ करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी हे फायदेशीर (Benefits Of Cycling) ठरू शकते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दररोज सायकल चालवण्यामुळे लठ्ठपणा (Obesity), हृदयरोग (Heart Disease), कर्करोग (Cancer), मानसिक आजार (Mental Illness), मधुमेह (Diabetes) आणि संधिवात (Rheumatoid Arthritis) यासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. सायकल चालविणे हा मुख्यतः एरोबिक व्यायामाचा (Aerobic Exercises) एक भाग आहे. यामुळे आपल्या हृदय (Heart), रक्तवाहिन्या (Blood Vessels) आणि फुफ्फुसांचा व्यायाम (Breathing Exercises) होतो.

 

 

सायकलिंगमुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो (Cycling Reduces Risk of Heart Diseases) –
शारीरिक निष्क्रियतेमुळे हृदयरोग, स्ट्रोक (Stroke), उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि हृदयविकाराचा धोका (Risk of Heart Attack) वाढतो. नियमितपणे सायकल चालवण्याच्या व्यायामामुळे आपले हृदय, फुफ्फुसे सुदृढ होऊन रक्ताभिसरण सुधारते (Blood Circulation Improves), ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. नियमित सायकल चालविणार्‍या 30,000 नागरिकांचा 14 वर्षांहून अधिक काळ अभ्यास केलेल्या डेन्मार्कमधील डॅनिश तज्ज्ञांच्या निष्कर्षानुसार असे आढळले आहे की, जे लोक नियमितपणे सायकल (Benefits Of Cycling) चालवतात त्यांना हृदयरोगाचा धोका कमी असतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सायकलिंगमुळे वजन कमी होते (Cycling Lose weight) –
नियमित सायकल चालविणे हा कॅलरी बर्न (Calories Burn) करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो.
वजन नियंत्रित करण्यासाठी (Weight Control) किंवा कमी करण्यासाठी सायकलिंगचा चांगला उपयोग होतो.
शिवाय शरिराचे विशेषतः हातापायाचे स्नायू तयार होता. तसेच आपला चयापचय दर (Metabolic Rate) वाढविण्यास मदत करते.
आठवड्यातून 2000 कॅलरी सायकलिंगद्वारे बर्न केल्या जाऊ शकतात.
दररोज अर्धा तास सायकल चालवल्यास वर्षाला पाच किलोग्रॅम चरबी जळून खाक होऊ शकते, असे ब्रिटिश संशोधनातून दिसून आले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आरोग्यविषयक फायद्यांविषयीही जाणून घ्या (Health Benefits of Cycling) :

हृदय व रक्तवाहिन्या सशक्त होतात (Heart and Blood Vessels become Stronger).

स्नायूंची शक्ती आणि लवचिकता वाढते (Increases Muscle Strength and Flexibility).

शारीरिक तणाव कमी होतो (Reduces Physical Stress).

स्नायू पिळदार आणि हाडे मजबूत होतात (Muscles and Bones become Stronger).

शरीरातील चरबीच्या पातळीत घट होते (Decreases Body Fat Level).

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर आहे (Improving Mental Health).

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Cycling | health benefits of cycling daily how good is cycling for your heart and weight management

 

हे देखील वाचा :

Tata Group Stock | भारताला मिळाली एक खुशखबर ! ज्यामुळे आता टाटा ग्रुपचा ‘हा’ शेयर पोहचणार रू. 3,000 पर्यंत, एक्सपर्ट बुलिश

Sharvari Wagh Hot Photos | कतरिना कैफच्या वहिनीनं घातले इतके पातळ कपडे, लाईट पडताच दिसले सगळे अंतरवस्त्र; फोटो व्हायरल

Pune Railway Station Platform Ticket | पुणे रेल्वे स्थानकावर विना प्लॅटफॉर्म तिकीट आढळला, तर होईल वीसपट दंड

 

Related Posts