IMPIMP

BJP Amit Shah – NCP Eknath Khadse | अमित शाह – एकनाथ खडसे यांच्यात फोनवर चर्चा ! नाथाभाऊ NCP सोडून पुन्हा भाजपात जाणार का? चर्चेला उधाण

by nagesh
 Eknath Khadse | eknath khadse statement on speculation of joining bjp and meeting with amit shah

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन – BJP Amit Shah – NCP Eknath Khadse | भाजपामध्ये सातत्याने अन्याय झाल्याचा आरोप करत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर 1 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सध्या एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असले तरी ते लवकरच पुन्हा भाजपामध्ये जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे हे भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते. परंतु शाह यांची भेट झाली नसली तरी दोघांनी फोनवर चर्चा केली. यामुळे राजकीय वर्तुळात खडसे यांच्याबाबत पुन्हा एकदा विविध अंदाज वर्तवले जात आहेत. (BJP Amit Shah – NCP Eknath Khadse)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एकनाथ खडसे यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत भाजपा खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, एकनाथ खडसे आणि मी अमित शाह यांच्या भेटीसाठी गेलो होतो परंतु शाह त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते भेटू शकले नाहीत. मात्र फोनवरून चर्चा झाली. चर्चा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यामुळे मी त्यावर बोलू इच्छित नाही. ज्यांना राजकारण करायचे असेल ते करणारच आहेत. मात्र नाथाभाऊ भाजपात येणार आहेत याबाबत मला माहिती नाही. मी भाजपात आहे आणि नाथाभाऊ राष्ट्रवादीत आहेत. (BJP Amit Shah – NCP Eknath Khadse)

 

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चेचे खंडन करताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शाह यांना भेटू नये असा नियम आहे का? मोदी-शाह यांच्यासोबत माझे जुने संबंध आहेत. मी अमित शाह यांना याआधीही भेटलो. यापुढेही भेटणार आहे. देवेंद्र फडणवीसांनाही भेटणार आहे. म्हणून त्याचा दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही.

 

एक वर्षापूर्वी खडसे यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
एकनाथ खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून मुख्यमंत्रिपदापासाठी एकनाथ खडसेंचे नाव चर्चेत होते.
परंतु ऐनवेळी भाजपा पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांना संधी दिली.
त्यानंतर हळूहळू एकनाथ खडसेंचे वर्चस्व पक्षात कमी होऊ लागले.
देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे आणि होत असलेल्या कोंडीमुळे खडसेंनी
भाजपाला रामराम केला होता.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- BJP Amit Shah – NCP Eknath Khadse | ncp leader eknath khadse will join bjp phone discussion with amit shah

 

हे देखील वाचा :

Aurangabad Accident News | शाळा सुटल्यानंतर घरी येत असताना 13 वर्षीय मुलीचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू

Pune Crime | पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) 60 ते 70 कार्यकर्त्यांवर बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Shahid Afridi | होय, मी चीटिंग केली होती ! ‘त्या’ सामन्याबाबत शाहिद आफ्रिदीचा मोठा खुलासा

Pune Crime | पती पत्नीच्या भांडणात गोळीबार, 8 वर्षाची मुलगी गोळी लागून जखमी; नर्‍हेमधील घटना, बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या ताब्यात

 

Related Posts