IMPIMP

BJP Leader Joins NCP | विधान परिषदेच्या तोंडावर भाजपला ‘दे धक्का’; ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

by nagesh
BJP Leader Joins NCP | bjp leader digvijay shinde joined ncp maharashtra mlc election 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन BJP Leader Joins NCP | एकिकडे विधान परिषद निवडणूकीमुळे (Maharashtra MLC Election 2022) राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे राजकीय भूंकपाच्या घटना देखील होताना दिसत आहेत. ऐन विधान परिषदेच्या तोंडावर भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. उस्मानाबाद (Osmanabad) येथील भाजपचे नेते दिग्विजय शिंदे (Digvijay Shinde) यांनी राष्ट्रवादीचं (BJP Leader Joins NCP) घड्याळ हाती बांधलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दिग्विजय शिंदे यांच्या वडिलांच्या विरोधात जाऊन त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. ”दिग्विजय शिंदे यांनी गेली अनेक वर्षे भाजपात काम केलं. आलेल्या अनुभवानंतर ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. वडिलांपासून फारकत घेऊन दिग्विजय शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा धाडसी निर्णय घेतला,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, मित्र पक्षांकडून कोणी येत असेल तर आम्ही नाही म्हणून सांगतो. पण भाजपकडून येत असेल तर Express way मोकळा आहे,’ असं देखील जंयत पाटील यांनी म्हटलं आहे. (BJP Leader Joins NCP)

 

त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “दिग्विजय शिंदेंसोबत अनेक सहकारी राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे.
इतके वर्ष एका पक्षात काम करणे आणि अचानक भूमिका बदलून पक्ष बदलणे हे एक आव्हान आहे.
तरी वडील भाजपमध्ये असताना त्यांनी राष्ट्रवादीमध्ये येण्याचं ठरवलं आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतो,”
तसेच, ‘शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत काम करणारे लोक आम्हाला सोडून गेले.
काही वैचारिक मतभेद त्यांचे असतील मात्र आता ते जरी सोडून गेले तरी त्या ठिकाणचा विकास आपल्याला करायचा आहे.”

 

पुढे अजित पवार म्हणाले, “तीन पक्षाच सरकार म्हटल्यावर काही नाराजी असते पण सरकार चाललं पाहिजे आमदारांची नाराजी नसू नये त्यात विकास कामासाठी एकत्रितपणे निर्णय सरकार म्हणून घेतले जातात.
प्रत्येक पक्ष त्यामध्ये शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress) आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करतोय,” असेही ते म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- BJP Leader Joins NCP | bjp leader digvijay shinde joined ncp maharashtra mlc election 2022

 

हे देखील वाचा :

Pune Crime | उत्तमनगर परिसरात टोळक्याकडून कोयते नाचवत वाहनांवर दगडफेक

Sidhu Moosewala Murder Case | संतोष जाधवच्या झाडाझडतीत पोलिसांना सापडले तब्बल 13 पिस्टल, नारायणगावमधून आणखी 4 जणांना अटक

Maharashtra Vidhan Parishad Election | ‘…आता चमत्कार कुणाबाबत घडतोय, हे अवघा महाराष्ट्र बघेल’ – अजित पवार

 

Related Posts