IMPIMP

Maharashtra Vidhan Parishad Election | ‘…आता चमत्कार कुणाबाबत घडतोय, हे अवघा महाराष्ट्र बघेल’ – अजित पवार

by nagesh
Ajit Pawar On Shivsena Dussehra Melawa | ajit pawar reaction on eknath shinde uddhav thackeray shivsena dussehra melawa controversy

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Vidhan Parishad Election | राज्याची विधानपरिषदेची निवडणूक (Maharashtra Vidhan Parishad Election) 20 जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यामध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपमध्ये (BJP) जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. ‘चमत्कार कुणाच्या बाबतीत घडतोय हे उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल.’ तसेच, महाविकास आघाडीचे सर्व सहा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार असल्याचं,’ देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

“चमत्कार होईल की आणखी काय होईल ते सगळं दिसेलचं. 11 पैकी 10 निवडून येणार आहे एक जण पराभूत होणार आहे, त्यामुळे तो चमत्कार तर घडणारच आहे. आता चमत्कार कुणाच्या बाबतीत घडतोय ते उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल. सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते आहे. जे 26 चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Vidhan Parishad Election)

 

“विधानपरिषद निवडणूक लागली आहे, 11 उमेदवार उभे आहेत. साधारण चार पक्षाचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सहा उमेदवार उभा केलेले आहेत. यामध्ये काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shivsena) या तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. मागील दोन दिवस मी विविध बातम्या पाहतोय, मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की आम्ही सगळेजणं हे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करतोय.” असं अजित पवार म्हणाले.

 

पुढे अजित पवार म्हणाले, “एक गोष्ट खरी आहे की शिवसेनेकडे 2 उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे मतं आहेत.
आमच्या 2 सदस्यांना अजूनही मतदान करण्याची परवानगी न्यायालयाने न दिल्याने आमची संख्या ही 51 आहे.
कोटा साधारण 26 चा आहे. अगदी काठावर धरून चालत नाही, कारण कालच्या राज्यसभा निवडणुकीत काय घडलं हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलंय.
त्यामुळे यदाकदाचित एखादं मतं दिलेलं बाद झालं, काही तिथे अडचण आली,
सभागृहात मतदान करत असताना कधी काय होईल सांगता येत नाही.” असं ते म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, “कधी नजरचुकीने देखील एखादी गोष्ट घडून जाते आणि त्याची किंमत शेवटी मोजावी लागते.
जसं मागील वेळेस एका शिवसेनेच्या सदस्यांस आमदार म्हणून दिलेलं मत हे बाद ठरवण्यात आलं.
म्हणून आम्ही सगळेजण काळजी घेतोय, कोटा जास्त कसा देता येईल याबद्दलचा प्रयत्न करत असल्याचं,” ते म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Vidhan Parishad Election | NCP leader ajit pawar addressed a press conference on the backdrop of legislative council elections

 

हे देखील वाचा :

Sidhu Moosewala Murder Case | मूसेवालाची हत्या झाली तेव्हा मी गुजरातमध्ये होतो, संतोष जाधवच्या खुलाशाने प्रकरणाला वेगळं वळण

Maharashtra MLC Election 2022 | विधानपरिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेची खबरदारी; उचललं मोठं पाऊल

Maharashtra MLC Election 2022 | ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा आमदारांना फोन, विधानपरिषदेसाठी दबाव’; नाना पटोलेंचा आरोप

 

Related Posts