IMPIMP

BJP MLA Ameet Satam | ‘मुंबईचा कोपरांकोपरा विकून तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला’ – आ. अमित साटम

by nagesh
BJP MLA Ameet Satam | Corruption of 3 lakh crores was done by selling the corners and corners of Mumbai -BJP MLA Ameet Satam

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शुक्रवारी सायंकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेतली
होती. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या (BMC) कामावर भाष्य केले. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचा कारभार गेले दोन महिने बंद असल्याचे
ठाकरेंनी यावेळी सांगितले होते. त्यावर त्यांना भाजप आमदार अमित साटम (BJP MLA Ameet Satam) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गेली 25 वर्षे
मुंबईतील कोपरांकोपरा विकून तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, असे अमित साटम म्हणाले आहेत. (BJP MLA Ameet Satam)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आदित्य ठाकरेंनी यावेळी अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि स्थायी समितीचा रखडलेला कारभार यावर भाष्य केले होते. तसेच त्यांनी मुंबई महापालिकेसाठी आलेले 5 हजार कोटींचे टेंडर देखील रिकॉल झाल्याचे सांगितले होते. त्यावर अमित साटम (Ameet Satam) म्हणाले, आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेतील बदल्यांवर बोलले. पण यावेळी ते त्यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बदल्या विसरले का? त्यांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी पैसे घेतले होते, हे ते विसरले का? त्यांच्या काळात सचिन वाझे प्रकरण बाहेर आले होते. त्यांच्या सरकारमध्ये अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक झाली होती. त्यांच्यावर 100 कोटी वसूल केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे आदित्य ठाकरेंना मुंबई पालिकेतील बदल्यांवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. (BJP MLA Ameet Satam)

 

तसेच शिवसेनेने गेल्या 25 वर्षांत मुंबई महापालिकेत विविध प्रकारचे टेंडर काढून तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. मुंबईतील रस्त्यांवर आदित्य ठाकरे बोलत आहेत. त्यांचे सरकार असताना त्यांनी ते का नाही सुधारले? त्यांच्या काळात 3000 कोटींचे टेंडर काढले गेले होते. ते कोणत्या स्थायी समितीच्या मंजुरीने काढले गेले? त्यांनी हे टेंडर काढले आणि त्यांच्या आवडत्या लोकांना दिले होते. मुंबई शहरातील रस्ते त्यांनी दुरुस्त केले नाहीत. पण 3 किलोमीटरचा देशातील सर्वात महागडा सायकल ट्रॅक (Cycle Track) त्यांनी तयार केला. त्याला कोणत्या स्थायी समितीने मंजुरी दिली होती. त्याचे टेंडर कोणी काढले होते, आदी प्रश्न यावेळी अमित साटम यांनी उपस्थित केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- BJP MLA Ameet Satam | Corruption of 3 lakh crores was done by selling the corners and corners of Mumbai -BJP MLA Ameet Satam

 

हे देखील वाचा :

Drishyam-2 | ‘दृश्यम 2’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी मोडला कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैय्या 2’चा रेकॉर्ड

Pune Crime | कोरेगाव पार्क येथील ‘कोरा कॉकटेल बार अँड किचन हॉटेल’वर गुन्हे शाखेची कारवाई

Rohit Pawar | ‘…म्हणून भाजप आणि शिंदे गटाने सावरकरांचा मुद्दा उचलून धरला’ – आ. रोहित पवार

 

Related Posts