IMPIMP

Pune Crime | कोरेगाव पार्क येथील ‘कोरा कॉकटेल बार अँड किचन हॉटेल’वर गुन्हे शाखेची कारवाई

by nagesh
Pune Crime News | Pune's staunch criminal lodged in Nashik Jail, CP Ritesh Kumar's 4th action under MPDA Act

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | कोरेगाव पार्क परिसरात रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम लावुन संगित वाजवणाऱ्या ‘कोरा कॉकटेल बार अँड किचन हॉटेल’वर (QORA- Cocktail Bar & Kitchen – Koregaon Park) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune) कारवाई केली आहे. पोलिसांनी हॉटेलमधून साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त केले आहे. ही कारवाई (Pune Crime) शुक्रवारी (दि.18) केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोरेगाव पार्क परिसरातील ‘कोरा कॉकटेल बार अँड किचन हॉटेल’ मध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने छापा टाकला असता मोठ्या आवाजात संगित सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हॉटेलवर कारवाई करुन 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टिम (Sound System) जप्त केले. पोलिसांनी हॉटेलवर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत (Environment Protection Act) ध्वनी प्रदुषण अधिनियमानुसार (Noise Pollution Act) कारवाई केली.
जप्त केलेला मुद्देमाल कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या (Koregaon Park Police Station) ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime branch action on QORA- Cocktail Bar & Kitchen Hotel’ at Koregaon Park

हे देखील वाचा :

Rahul Dravid | राहुल द्रविडचा बचाव करत आर अश्विनने रवी शास्त्रींना दिले चोख प्रत्युतर; म्हणाला…..

Rohit Pawar | ‘…म्हणून भाजप आणि शिंदे गटाने सावरकरांचा मुद्दा उचलून धरला’ – आ. रोहित पवार

Kantara OTT Release | बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा कांतारा सिनेमा ‘या’ दिवशी होणार OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज

Related Posts