IMPIMP

BJP MLA Ashish Shelar | ‘सकाळी सीरियल किलर…’ संजय राऊतांच्या टीकेवर आशिष शेलारांचा पलटवार म्हणाले-‘लोकशाही आणि संविधानामुळे तुम्ही…’

by nagesh
BJP MLA Ashish Shelar | ashish shelar says people turn off tv after seeing serial killer sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – BJP MLA Ashish Shelar | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) हे
सातत्याने भाजपवर (BJP) टीका करत असतात. त्यांच्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर दिले जाते. संजय राऊत रोज सकाळी घेत असलेल्या पत्रकार
(Maharashtra Political News) परिषदेवर भाजपने टीका केली होती. या टीकेला शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन राऊतांनी उत्तर दिले.
‘तुम्ही कारस्थानं बंद करा, आम्ही बोलणं बंद करतो, माझ्या ऐवजी तुम्ही 9.30 वाजता बोला’. राऊतांच्या या टीकेवर भाजप आमदार आशिष शेलार (BJP
MLA Ashish Shelar) यांनी पलटवार केला आहे.

 

आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) म्हणाले, रात्री 9.30 वाजता लोक टीव्ही सुरु करतात आणि सीरियल पाहतात. सकाळी 9.30 वाजता लोक टीव्ही बंद करतात कारण सीरियल किलर वेड्यासारखा बडबडत असतो ते त्याला बघतात. संजय राऊतांनी लोकशाही (Democracy) धोक्यात असल्याचे वक्तव्य केले होते यावर शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, लोकशाही धोक्यात आहे, असं संजय राऊतांनी बोलूच नये. कारण लोकशाहीमुळे आणि देशातील संविधानामुळे (Constitution) ते जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर टीका

भाजपची ‘वज्रमूठ’ (MVA Vajramuth Sabha) ही विकासाची ‘वज्रमूठ’ आहे. तर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ ही तडा गेलेली आहे. महाविकास आघाडीचे तीन तोंड तीन वेगळ्या दिशेला आहेत. त्यांचा एक भोंगा सकाळी नऊ वाजता वाजतो. दुसरा भोंगा त्याच्या विरुद्ध दुपारी बारा वाजता वाजतो. तर तिसरा भोंगा संध्याकाळी वेगळंच काहीतरी बोलतो. त्यामुळे हे लोक राज्यातील जनतेसाठी काहीही करु शकत नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

 

 

Web Title :- BJP MLA Ashish Shelar | ashish shelar says people turn off tv after seeing serial killer sanjay raut

 

हे देखील वाचा :

Satyashodhak Marathi Movie | ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या टीझरचे शरद पवार यांच्याकडून कौतुक

Maharashtra Dream Achievers Awards | चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा सन्मान सोहळा ‘महाराष्ट्र ड्रीम अचिव्हर अवॉर्ड’ 15 एप्रिल रोजी पार पडणार

Governor Ramesh Bais | निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांची होणार गच्छंती? महाराष्ट्राला मिळणार नवे राज्यपाल; हालचालींना वेग

Police Inspector Dies In Accident | दुर्देवी ! भरधाव बसच्या धडकेत पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

 

Related Posts