IMPIMP

Satyashodhak Marathi Movie | ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या टीझरचे शरद पवार यांच्याकडून कौतुक

by nagesh
Satyashodhak Marathi Movie | Sharad Pawar praised the teaser of the marathi movie Satyashodhak

सरकारसत्ता ऑनलाईन – Satyashodhak Marathi Movie | महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, समता फिल्म्स (Samta Films) प्रस्तुत महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित “सत्यशोधक” या आगामी चित्रपटाच्या टीमने शरद पवार (Sharad Pawar) यांची पुण्यात भेट घेतली.

 

याप्रसंगी भारती विद्यापीठाचे प्र कुलगुरू मा. डॉ. विश्वजित कदम, चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादूर, विशाल वाहुरवाघ तसेच लेखक आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांच्यासह चित्रपटातील कलाकार मोनिका तायडे आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. जेष्ठ मार्गदर्शक मा. बाळासाहेब बांगर, मा. हनुमंत माळी,बाबासाहेब पाटील, कार्यकारी निर्माता शिवा बागुल हे उपस्थित होते. या वेळी शिवा बागुल यांनी चित्रपट विषयी माहिती दिली, तसेच निर्माते आप्पा बोराटे यांनी चित्रपट बनवण्यासाठी केलेला प्रवास व चित्रपट प्रदर्शनाविषयी माहिती दिली. त्यानंतर चित्रपटाचा टिझर सर्वांना दाखविण्यात आला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रसंगी शरद पवार यांनी मनोगत व्यक्त करताना, महात्मा फुलेंच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांची आठवण करून दिली. नव्या विज्ञान युगात महात्मा फुले यांनी त्याकाळी मांडलेले विचार किती महत्त्वाचे आहेत याची माहिती दिली. महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावर चित्रपट येतोय म्हणून त्यांनी आनंद व्यक्त केला व भविष्यात या चित्रपटाला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देत त्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. (Satyashodhak Marathi Movie)

 

निर्माते प्रवीण तायडे यांनी “सत्यशोधक” हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली.

 

 

Web Title :- Satyashodhak Marathi Movie | Sharad Pawar praised the teaser of the marathi movie Satyashodhak

 

हे देखील वाचा :

Maharashtra Dream Achievers Awards | चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा सन्मान सोहळा ‘महाराष्ट्र ड्रीम अचिव्हर अवॉर्ड’ 15 एप्रिल रोजी पार पडणार

Governor Ramesh Bais | निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांची होणार गच्छंती? महाराष्ट्राला मिळणार नवे राज्यपाल; हालचालींना वेग

Police Inspector Dies In Accident | दुर्देवी ! भरधाव बसच्या धडकेत पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

 

Related Posts