IMPIMP

Governor Ramesh Bais | निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांची होणार गच्छंती? महाराष्ट्राला मिळणार नवे राज्यपाल; हालचालींना वेग

by nagesh
 Governor Ramesh Bais | governor of maharashtra ramesh bais will soon be relieved from the post of governor

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Former Governor Bhagat Singh Koshyari) हे नेहमीच त्यांच्या
वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहिले होते. भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदावरुन उचलबांडी केल्यानंतर त्यांच्या जागेवर रमेश बैस यांची राज्यपाल
(Governor Ramesh Bais) म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, आता रमेश बैस यांना देखील लवकरच राज्यपाल (Governor Ramesh Bais)
पदावरून कार्यमुक्त केले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. तशा हालचाली भाजपमध्ये (BJP) सुरु झाल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांना कार्यमुक्त केल्यानंतर महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळणार आहेत. त्यामुळे राज्यात नवे राज्यपाल म्हणून कोण येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्तीसगडमध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन कार्यमुक्त केले जाणार आहे. छत्तीसगड जिंकण्यासाठी बैस यांना कार्य़मुक्त केले जाणार असल्याची चर्चा आहे.

 

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Chhattisgarh Assembly Elections) होणार आहे. राज्यात भाजपकडे रमेश बैस यांच्यासारखा प्रभावी चेहरा नाही. त्यामुळे रमेश बैस यांच्याकडे या निवडणूकीची जबाबदारी देण्याचा भाजपचा भर आहे. रमेश बैस हे छत्तीसगडच्या रायपूर लोकसभा मतदारसंघातून (Raipur Lok Sabha Constituency) सात वेळा निवडून आले आहेत. शांत आणि संयमी नेते म्हणून रमेश बैस यांच्याकडे पाहिले जाते. याशिवाय पक्षाचा आणि जनतेचाही ते सर्वसामान्य चेहरा आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप त्यांना मैदानात उतरवून छत्तीसगड जिंकण्याचा प्रयत्न करत आहे.

 

रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून कार्यमुक्त केल्यानंतर त्यांच्या जागेवर कोण येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच महाराष्ट्रातही निवडणुका (Maharashtra Elections) होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वाच्या नेत्याला राज्यपाल म्हणून पाठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपच्या पुढील राजकीय खेळीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Governor Ramesh Bais | governor of maharashtra ramesh bais will soon be relieved from the post of governor

 

हे देखील वाचा :

Police Inspector Dies In Accident | दुर्देवी ! भरधाव बसच्या धडकेत पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी माफी मागावी, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा (व्हिडिओ)

Pune Cantonment Board | दिलासादायक ! आजपासून पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये टोल वसुली बंद

Dada Bhuse | एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर रडल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा, दादा भुसेंची बोचरी टीका म्हणाले-‘छोटे युवराज…’

 

Related Posts