IMPIMP

BJP MLA Ganesh Naik | भाजप आमदार गणेश नाईक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

by nagesh
BJP MLA Ganesh Naik | bjp mla ganesh naik disposed of rape and intimidation case

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन BJP MLA Ganesh Naik | लैंगिक अत्याचार आणि धमकीप्रकरणी भाजप आमदार गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अटक होणार असल्याचे लक्षात येताच आमदार नाईक यांनी दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन (Pre-Arrest Bail) मिळावा यासाठी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाकडून आमदार नाईक यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एका महिलेने भाजपचे आमदार गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांच्या विराधोत धमकी आणि लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. तक्रार दाखल होताच धमकी प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात (CBD Belapur Police Station) तर लैंगिक अत्याचार प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात (Nerul Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह ॲण्ड रिलेशनशीपमध्ये नाईक माझ्याबरोबर राहत होते. आम्हाला एक मुलगाही झाला असून मुलास वडील म्हणून नाईक यांचे नाव मिळावे अशी मागणी केली होती असा दावा संबंधित महिलेने तक्रारीत केला आहे.

 

दरम्यान, मार्च 2021 मध्ये आमदार गणेश नाईक यांनी बेलापूर येथील सेक्टर 15 मधील कार्यालयात पीडित महिलेला बोलावून घेत महिलेवर रिव्हॉल्व्हर ‘रोखून तू जास्त बोलू नको. तू काय करणार? तुम्ही मला त्रास देऊ नका नाही तर मी स्वत:ला पण संपवेल आणि तुम्हाला सुद्धा संपवेल’ अशी जीवे मारण्याची धमकी नाईक यांनी दिल्याचे पीडितेने म्हटले आहे. पीडितेने या संबंधित राज्य महिला आयोगाकडे (Maharashtra State Women’s Commission) ही तक्रार दिली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांनी दाखल गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार नाईक यांना अटक करण्याच्या हालचाली सुरु केल्या असता
त्यांनी दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी ठाणे सत्र न्यायालयात (Thane Sessions Court) अर्ज केला होता.
मात्र, त्यांना न्यायालयाने दिलासा दिला नाही. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती.
उच्च न्यायालयाने (Bombay High Court) त्यांना अटकेपासून दिलासा देत 1993 पासून दोघांमधील संबंध हे संमतीने होते.
त्याला सकृतदर्शनी बलात्कार म्हणता येणार नाही, असे नमूद केले.
त्याचबरोबर अटक झाल्यास वैयक्तिक बंधपत्रावर सुटकेचे आदेश दिले असून
नाईक यांच्याकडे असलेली रिव्हॉल्व्हर पोलिसांकडे जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

 

Web Title :- BJP MLA Ganesh Naik | bjp mla ganesh naik relief from bombay mumbai high court

 

हे देखील वाचा :

Sandeep Deshpande | महिला पोलीस जखमी झाल्याने संदीप देशपांडे अडचणीत; FIR दाखल होणार ?

MNS Chief Raj Thackeray | ‘हे कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच’; राज ठाकरेंचा पुन्हा इशारा

Pune Crime | कैलास स्मशानभूमीतील जळीत प्रकरणात भाजलेल्या एकाचा मृत्यु; रॉकेल टाकणार्‍याला अटक

 

Related Posts